Border-Gavaskar Trophy 2024-25: न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघासमोर आता मोठं आव्हान आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ घरच्या मैदानावरील पराभवामुळे दुसऱ्या क्रमांकावर घसरला. आता तर त्यांचे WTC Final खेळण्याचे स्वप्नही अधांतरी होत चालले आहे. भारताला कुणाच्याही आधाराशिवाय अंतिम सामना खेळायचा असेल, तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय मिळवावा लागेल. संघाचा फॉर्म पाहता हे शक्य होईल असे वाटत नाही. त्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याचे वृत्त समोर येत आहे. त्यावरून भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांना संताप अनावर झाला आहे.