Rohit Sharma दुसऱ्यांदा होणार बाबा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये कसोटी खेळणार की नाही? स्वत: च दिली माहिती

Rohit Sharma to be Father second time: भारताचा न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत ३-० ने पराभव झाल्यानंतर WTC फायनलमध्ये पोहचण्याचे भारतासमोरील आव्हान आणखी वाढले आहे.
rohit sharma
rohit sharmaesakal
Updated on

IND vs NZ Rohit Sharma PC: भारत आज मुंबईमध्ये घरच्या मैदानावर २४ वर्षांनी व्हाईट वॉश झाला. याआधी २००० मध्ये सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन कसोटी सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आता २०२४ मध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत रोहितच्या शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला सर्व सामने गमवावे लागले. या पराभवावर बोलताना रोहित शर्माने स्वत:च्या खेळीवर नाराजी व्यक्त केली व फिरकीविरूद्ध चांगली खेळी करणाऱ्या शुभमन गिल आणि ऋषभ पंतचे कौतुक केले. यावेळी रोहितने पर्थमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावरही भाष्य केले.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही सामन्यात खूप चुका केल्या आणि आम्हाला त्या स्वीकाराव्या लागतील. आम्ही सुरूवातीच्या सामन्यांतील पहिल्या डावात (बेंगळुरू आणि पुणे) पुरेशा धावा केल्या नाहीत. त्यामुळे आम्ही खेळात मागे होतो, पण इथे आम्हाला २८ धावांची आघाडी मिळाली होती. आम्हाला वाटले की आम्ही सामन्यात पुढे आहोत, लक्ष्य देखील सोपे होते. पण इथे आणखी चांगल्या कामगिरिची गरज होती."

संपूर्ण मालिकेत रोहित फलंदाजीमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला. त्याच्या खराब खेळीबद्दल रोहित म्हणाला, "मी माझ्या योजना सरावात पूर्ण करू शकलो नाही आणि मालिकेतील माझी कामगिरी निराशाजनक होती. मी माझ्या बचावावरील विश्वास गमावलेला नाही. या दोन मालिकांमध्ये मी चांगली फलंदाजी केली नाही, पण तुम्ही जेवढे जास्त खेळता, तेवढे तुम्ही एक फलंदाज म्हणून विकसित होत असता. मी विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे."

त्याचबरोबर संपुर्ण सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना. न्यूझीलंडच्या फिरकीसमोर उल्लेखनीय फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत व शुभमन गिलचेही रोहितने कौतुक केले.

मागच्या काही दिवसापासून २२ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच काल समालोचक हर्षा भोगलेंनी रोहित पुन्हा वडील होणार असल्याचे सांगितले. यावर बोलताना रोहित म्हणाला, " मी पहिला सामना खेळणार की नाही हे अजून मला माहित नाही, मी फक्त देवाकडे प्रार्थना करत आहे."

मायदेशात न्यूझीलंडकडून भारताचा ०-३ असा पराभव झाल्याने, भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने क्रमतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पुन्हा एकदा जागतिक कसोटी अजिंक्यापद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताला अंतिम फेरीत पोहोच्याण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांपैकी ४ सामने जिंकणे आवश्यक आहे. तर ऑस्ट्रेलियाही ४ सामने जिंकून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.