क्रिकेट
IND vs AUS : आपसातल्या मॅचमध्ये स्टार फलंदाजांना फुटला घाम! KL Rahul जखमी, विराट कोहली फार नाही टिकला
India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आजपासून खऱ्या अर्थाने तयारी सुरू झाली.
India Practice Match vs India A: जलदगती गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तग धरून राहणे तसे अवघडच.. बाऊन्सर, इनस्विंग-आऊटस्विंग घेणारे चेंडूंचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी कंबर कसली होती. पण,भारत अ संघाविरुद्धच्या सराव सामन्यातच प्रमुख भारतीय संघाच्या फलंदाजांचा घाम फुटलेला दिसला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करण्यापूर्वी भारतीय फलंदाजांनी आपसात मॅच खेळली आणि त्यातही त्यांची दैना झालेली दिसली. KL Rahul च्या दुखापीतने टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो पर्थ कसोटीत सलामीला खेळण्याची शक्यता आहे. मात्र, खराब फॉर्म त्याचाही पिच्छा सोडताना दिसत नाहीए. आज त्याने २९ धावा केल्या, परंतु दुखापतग्रस्त होऊन तो माघारी परतला.