Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule : टीम इंडियाच्या नवीन मालिकेची घोषणा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी रंगणार कसोटीचा थरार? जाणून घ्या शेड्युल

India Vs Australia Test Series Schedule Announced : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे.
Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News Marathi
Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News Marathi
Updated on

Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे.

दोन्ही संघांमधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील सामने पर्थ, ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जातील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणारा या मालिकेतील अंतिम सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी त्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News Marathi
Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि भारत जाणून घ्या शेड्युल

  • पहिली कसोटी: २२-२६ नोव्हेंबर, पर्थ

  • दुसरी कसोटी: ६-१० डिसेंबर, ॲडलेड (दिवस रात्र कसोटी)

  • तिसरी कसोटी: १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन

  • चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर, मेलबर्न

  • पाचवी कसोटी: ३-७ जानेवारी, सिडनी

Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News Marathi
Virat Kohli: तोच विराट अन् तिचं बेन स्टोक्सची आठवण,नॉन स्ट्रायकर एंडवर विराटचा कारनामा; ऐकून मॅक्सवेलही खुदकन गालात हसला

आतापर्यंत एकूण 16 वेळा बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. टीम इंडियाने 10 वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. कांगारू संघ केवळ 5 वेळा जिंकला आहे. तर 2003-04 मध्ये एकदा ही मालिका अनिर्णित राहिली होती.

तर, गेल्या पाच बॉर्डर गावसकर ट्रॉफीपैकी भारताने सलग चार सामने जिंकले आहेत. यापैकी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरच्या मैदानावर दोनदा पराभूत केले आहे. आता पुन्हा एकदा 17वी बॉर्डर गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात होणार आहे.

Ind vs Aus Test Series 2024-25 Schedule News Marathi
IPL: विराटला झप्पी तर धोनीला नमस्कार, आजवर या वेड्या चाहत्यांनीही सुरक्षा तोडत केलीये मैदानात एन्ट्री, पाहा Video

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियन संघ गतविजेता असला तरी. पण टीम इंडियाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही भारतीय संघ अव्वल आहे.

यावर्षी टीम इंडियाला बांगलादेशचा दौरा करायचा असून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मालिकाही खेळायची आहे.

भारतीय संघाने मागील दोन्ही आवृत्त्यांची अंतिम फेरी खेळली आहे. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत पराभूत केले होते. आणि त्याआधी 2021 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताच्या आशा भंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.