India vs Australia Virat Kohli: विराट कोहली तंदुरुस्त आहे का? त्याला कोणती दुखापत तर झाली नाही ना? असे प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आले आहेत. The Sydney Morning Herald या ऑस्ट्रेलियन मीडियाने एक बातमी जाहीर केली आणि त्यात त्यांनी असे म्हटले की भारताचा स्टार फलंदाज विराट याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. कारण, तो हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी गेला होता. भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटीत २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे आणि त्यात कर्णधार रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. रोहित वैयक्तिक कारणामुळे अजूनही भारतात आहे आणि तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होईल. अशा परिस्थितीत संघातील अनुभवी फलंदाज म्हणून विराटवर सर्व जबाबदारी आहे. मात्र, सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्ताने भारतीयांची चिंता वाढली आहे.