Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Virat Kohli, KL Rahul Injury Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय खेळाडू आपसात सराव सामना खेळत आहेत आणि त्यात लोकेश राहुलला दुखापत झाली आहे. विराट कोहलीही जखमी असल्याचे वृत्त आहे.
Virat Kohli, KL Rahul Injury
Virat Kohli, KL Rahul Injury esakal
Updated on

India vs Australia, Intra Squad match Injury: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, विराट कोहली, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी नेट्समध्ये चांगला जोर लावला. सिडनी मॉर्निंग हेराल्डने विराट स्कॅनसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केलं अन् त्याला दुखापत झालीय का, अशी चिंता वाटू लागली. त्यात आजच्या सराव सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलच्या कोपऱ्यावर चेंडू आदळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत आणखी भर पडली. या दोन्ही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीबाबत BCCI कडून महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.