India vs Bangladesh 1st T20I :ग्वालियरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर भारत-बांगलादेश टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. या स्टेडियमवर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे नेतृत्व असून ही मालिका म्हणजे भारतासाठी आपली ताकद तपासण्याची संधी आहे.
भारतीय संघात सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग हे अनुभवी खेळाडू असून मयंक यादव, किडीशकुमार रेड्डी व हर्शित या उदयोन्मुख खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. राखीव खेळाडूंची उपयुक्तता तपासण्याची ही चांगली संधी आहे.
भारतीय संघाची रणनीती ठरली असून काल झालेल्या पत्रकार परिषत कर्णधार सूर्यकुमार यादवकने अभिषेक शर्मा व संजू सॅमसन भारताकडून सलामीसाठी उतरतील अशी धोषणा केली. फलंदाजीसाठी ग्वालियरमधील खेळपट्टी चांगली आहे, असेही सुर्यकुमार म्हणाला. ग्वालियरमधील दोन दिवसाच्या सरवानंतर भारतीय संघ आता मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
वेगवान गोलंदाज मयंक यादव व हर्शित राणाला उद्याच्याच सामन्यात संधी मिळू शकते. झिम्बावेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माला छाप सोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजीची धुरा बहुधा आयपीएलमध्ये १५० किलोमीटर प्रती खास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादवकडे राहाण्याची शक्यता आहे. त्याच्या सोबतीला राणा, अष्टपैलू हार्दिक पंडया, वॉशिंगटन सुंदर आणि रवी बिष्णोई राहण्याची शक्यता आहे.
सामना सायंकाळी ७ वाजता ग्वालियरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर हा सामना सुरू होईल.
मोबाईमध्ये जिओ सिनेमा आणि टी.व्हीमध्ये स्पोर्ट १८ नेटवर्कवर हा सामना पाहता येईल.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉश्गिंटन सुंदर, रवी बिष्णोई, मयंक यादव, हर्शित राणा, अर्शदीप सिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.