IND vs BAN 1st Test: १६ जणांची निवड, ११ जण खेळणार; ५ खेळाडू कोण ज्यांना संधी नाही मिळणार?

India Playing XI vs Bangladesh 1st Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १६ खेळाडूंची निवड केली आहे आणि त्यातले ११ अव्वल खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसतील. ५ खेळाडूंना बेंचवर बसून राहावे लागेल.
TeamIndia vs BAN
TeamIndia vs BAN esakal
Updated on

Team India Probable Playing XI vs BAN 1st Test:

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला गेला आहे. ऋषभ पंत २० महिन्यानंतर कसोटी संघात परतला आहे, तर जसप्रीत बुमराहचेही पुनरागमन झाले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा हेही सुट्टीवरुन परतणार आहेत. यश दयालला पदार्पणाची संधी मिळाली आहे, तर दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना गाजवणाऱ्या आकाश दीपने संघातील स्थान कायम राखले आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

TeamIndia vs BAN
Jasprit Bumrah चा BCCIकडून गेम; कसोटी संघात घेतलं खरं, पण...; कुणाच्याही हे लक्षात नाही आलं

१६ पैकी ते ११ कोण?

BCCI ने जाहीर केलेल्या १६ खेळाडूंपैकी ५ जणांना बाकावर बसावे लागेल हे निश्चित आहे. जर रवींद्र जडेजा खेळणार असेल तर अक्षर पटेलला संधी मिळणे कठीण आहे. पण, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अक्षरने अष्टपैलू कामगिरी करून दाखवली आहे. ब्रेक घेऊन जडेजा परतला आहे आणि अशात कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यांमध्ये अक्षर बेंचवर होता. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजासोबत कुलदीप आणि अश्विनला संधी मिळू शकते.

TeamIndia probable playing XI
TeamIndia probable playing XI esakal

जसप्रीत बुमराहसोबत जलदगती गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मोहम्मद सिराज, आकाश दीप व यश दयाल हे ३ पर्याय आहेत. अशात या तिघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. आकाशने दुलीप ट्रॉफीत एका सामन्यात ९ विकेट्स घेतल्या असल्या तरी बुमराह व सिराज हे दोन प्रमुख गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये पक्के आहेत. यश व आकाश दोघांनाही बाकावर बसावे लागेल.

TeamIndia probable playing XI
TeamIndia probable playing XI esakal

आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या स्पेलमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या. बुमराहच्या जागी त्याला ही संधी मिळाली होती. इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत ध्रुव जुरेलनेही उल्लेखनीय कामगिरी केली होती. पण, आता ऋषभ पंतचे पुनरागमन झाल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. दुलीप ट्रॉफीत मागील सामन्यात ध्रुवने एका डावात ७ झेल घेत महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

TeamIndia probable playing XI
TeamIndia probable playing XI esakal

सर्फराज खानला टीम इंडियात कायम ठेवण्यात आले असले तरी त्याचे खेळणे अवघड आहे. लोकेश राहुल पहिल्या कसोटीत खेळणार हे निश्चित दिसत आहे आणि त्यामुळे सर्फराजला बेंचवर राहावे लागेल.

TeamIndia vs BAN
IND vs BAN 1st Test: Shreyas Iyer, मोहम्मद शमी यांना कसोटी संघात का नाही मिळालं स्थान? जाणून घ्या Inside Story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.