India vs Bangladesh 1st test Update: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेला गुरुवारी (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिला सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सुरू झाला आहे.
या सामन्यात दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा डाव १४९ धावांवरच संपला. त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला आहे. दुसऱ्या डावातही भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरूवात केली.
रोहित आणि जैस्वालने सकारात्मक सुरुवात केली होती, परंतु तिसऱ्या षटकात भारताला मोठा धक्का तस्किन अहमदने दिला. त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माला अवघ्या ५ धावांवर बाद केले. रोहितचा झेल तिसऱ्या स्लीपमध्ये झाकिर हसनने घेतला. रोहित बाद झाल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजीला आला आहे.
दरम्यान, रोहित पहिल्या डावातही ६ धावांवर बाद झाला होता. या डावातही हसन मेहमुदविरुद्ध खेळताना रोहित स्लीपमध्येच झेल देत बाद झाला होता.
रोहितची बांगलादेशविरुद्ध फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. त्याने बांगलादेशविरुद्ध ४ सामन्यांत ४४ धावाच केल्या आहेत.
रोहितनंतर यशस्वी जैस्वालही दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला. त्याला ७ व्या षटकात नाहिद राणाने १० धावांवर बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक लिटन दासने पकडला. जैस्वालने पहिल्या डावात ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान पहिल्या डावातही त्याला नाहिद राणानेच बाद केले होते.
तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने १३३ चेंडूत ११ चौकार आण २ षटकारांसह ११३ धावा केल्या. तसेच रविंद्र जडेजाने १२४ चेंडूत ८६ धावा केल्या. अश्विन आणि जडेजा यांच्यात १९९ धावांची भागीदारी झाली. यशस्वी जैस्वालनेही ५६ धावांची खेळी केली.
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात हसन मेहमुदने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमदने ३ विकेट्स घेतल्या, तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव ४७.१ षटकात १४९ धावांवर संपला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ३२ धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच मेहदी हसन मिराजने नाबाद २७ धावांची खेळी केली, तर लिटन दासने २२ धावा केल्या. नजमुल हुसैन शांतोने २० धावांची खेळी केली.
भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.