IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

India vs Bangladesh Chennai Test: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे लवकर थांबवावा लागला. या सामन्यात भारताला आता विजयासाठी ६ विकेट्सची गरज आहे.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test, 3rd Day Updates: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. शनिवारी (२१ सप्टेंबर) या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ झाला. मात्र तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राच्या अखेरीस काळे ढग आल्याने अंधार झाला होता. त्यामुळे खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळही थांबला.

खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावात ३७.२ षटकात ४ बाद १५८ धावा धावा केल्या आहेत. बांगलादेशला अद्याप विजयासाठी ३५७ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी ६ विकेट्सची गरज आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो ५१ धावांवर नाबाद आहे, तर शाकिब अल हसन ५ धावांवर नाबाद आहे.

Team India
IND vs BAN: ऋषभ पंत अन् Shubman Gill यांचा शतकी धमाका; भारताने ४ बाद २८७ धावांवर केला डाव घोषित

या सामन्यात भारताने पहिल्या डावातील २२७ धावांच्या आघाडीसह बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून झाकिर हसन आणि शादमन इस्लाम या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

पण १७ व्या षटकात त्यांची जोडी झाकिर हसनला बाद करत जसप्रीत बुमराहने तोडली. झाकिरचा ३३ धावांवर अप्रतिम झेल यशस्वी जैस्वालने घेतला. त्यानंतर शादमन इस्लामलाही ३५ धावांवर आर अश्विनने बाद केले.

त्यानंतर एक बाजू कर्णधार शांतोने सांभाळली होती. परंतु, दुसऱ्या बाजूने मोमिनुल हक आणि मुशफिकूर रहिम यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. या दोघांनाही अश्विनने बाद केले. रहिमला जमिनीलगत केएल राहुलने चांगला झेल घेतला. दरम्यान, यानंतर सामना थांबला.

Team India
IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

तत्पुर्वी तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात २४ व्या षटकापासून आणि ३ बाद ८१ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली. त्यावेळी शुभमन गिल ३३ धावांवर आणि ऋषभ पंत १२ धावांवर खेळत होता. या दोघांनी तिसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करताना १६७ धावांची भागीदारी केली. तसेच दोघांनीही शतके देखील साजरी केली.

ऋषभ पंतने १२८ चेंडूत १०९ धावा केल्या. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ४ षटकार मारले. गिलनेही त्याचे शतक पूर्ण केले. गिलने १७६ चेंडूत ११९ धावांनी नाबाद खेळी केली. त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. केएल राहुलने १९ चेंडूत ४ चौकारांसह आक्रमक २२ धावांची नाबाद खेळी केली.

भारताने दुसरा डाव ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. त्याआधी भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात रोहित शर्मा (५), यशस्वी जैस्वाल (१०) आणि विराट कोहली (१७) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या.

Team India
IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडून आर अश्विनने ११३ धावांची शतकी खेळी केली, तर रविंद्र जडेजाने ८६ धावा केल्या आणि यशस्वी जैस्वालने ५६ धावा केल्या. बांगलादेशकडून हसन मेहमुदने ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला.

त्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवरच संपला. त्यांच्याकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ३२ धावा केल्या, त्याच्याशिवाय कोणालाही ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.