India vs Bangladesh, 1st Test: बांग्लादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला बांगालादेशविरुद्ध २ कसोटी आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, पहिल्या कसोटीसाठी भारताच्या निवड समितीने १६ जाणांची निवड केली आहे. यातील केवळ ११ खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू आहे.
कसोटी मालिका भारतात असल्याने फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्टी मिळण्याची शक्यता आहे. अशाच भारताच्या संघात सध्या फिरकी गोलंदाजीसाठी आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल असे चार पर्याय आहेत.
पण आता अशी माहिती समोर येत आहे की पहिल्या कसोटीत भारतीय संघव्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विन, जडेजा आणि कुलदीप यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे अक्षर पटेलला पहिल्या सामन्यात बेंचवर बसावे लागू शकते.