IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघाचा पहिला डाव गुंडाळण्यात बांगलादेशला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यश आले
India vs Bangladesh
India vs Bangladesh esakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : भारतीय संघाचा पहिला डाव गुंडाळण्यात बांगलादेशला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात यश आले. रवींद्र जडेजा ८६ धावांवर बाद झाल्यानंतर आर अश्विनने सामन्याची सूत्र हाती घेतली होती. पण, तळाच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. अश्विन आणि Ravindra Jadeja या जोडीची १९९ धावांची भागीदारी तुटली. जडेजाला शतकाने हुलकावणी दिली. पण, भारताने पहिल्या डावात मजबूत धावसंख्या उभ्या केल्या. बांगलादेशचा हसन महमूदने ( Hasan Mahmud) पाच विकेट्स घेतल्या.

अश्विनच्या शतकाने आणि रवींद्र जडेजाने दिलेल्या सोबतीने पहिला दिवस गाजला. रोहित शर्मा ( ६), शुभमन गिल ( ०), विराट कोहली ( ६) यांच्या पटापट विकेट गेल्याने भारताची अवस्था ३ बाद ३४ अशी झाली होती. यशस्वी जैस्वाल ( ५६) आणि ऋषभ पंत ( ३९) यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. लोकेश राहुल १६ धावांवर बाद झाला.

India vs Bangladesh
IND vs BAN 1st Test: Ravindra Jadeja काल होत्या तेवढ्याच धावांवर बाद झाला; शतकाची थोडक्यात हुलकावणी

अश्विन व जडेजा या अनुभवी खेळाडूंनी दिवसाखेर मैदानावर जम बसवला होतता. या दोघांनी सातव्या विकेटसाठी २४० चेंडूंत १९९ धावा जोडून अनेक विक्रम मोडले. दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला तेव्हा जडेजा एकही धावेची भर न घातला ८६ धावांवर माघारी परतला. जड्डूने १२४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या ही खेळी केली. आकाश दीपनेही २४ धावांची भागीदारी करून अश्विनला चांगली साथ दिली.

IND vs BAN 1st Test Day 2
IND vs BAN 1st Test Day 2esakal

भारताच्या धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात अश्विनने फटकेबाजी सुरू केली आणि तो तस्किन अहमदला विकेट देऊन बसला. १३३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर हसन महमूदने ५ विकेट्स घेतली आणि भाराचा डाव ३७६ धावांवर गुंडाळला.

India vs Bangladesh
१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.