IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

India vs Bangladesh 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत २८० धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
team india
team indiaesakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi India have more wins than defeats in Test : भारतीय संघाने चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या R Ashwin ने चौथ्या डावात २१-०-८८-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. शुभमन गिल व ऋषभ पंत यांनीही भारताच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीचे योगदानही या सामन्यात राहिले.

भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित करून बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. पाहुण्यांचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला आणि भारताचा विजय पक्का झाला. जडेजाने ३ विकेट्स घेतल्या.

ऐतिहासिक विजय

भारतासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. २५ जून १९३२ साली भारताने पहिली कसोटी खेळली होती आणि त्यानंतर ९२ वर्षांनी होणाऱ्या कसोटीत काहीतरी खास विक्रम संघाला खुणावत होता. त्यामुळे २२ सप्टेंबर हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला. १९३२च्या पहिल्या कसोटीनंतर भारताला पहिला विजय मिळवण्यासाठी तब्बल २० वर्ष वाट पाहावी लागली. १९५२ मध्ये इंग्लंडवर भारताने हा विजय मिळवला होता. बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकताच टीम इंडियाच्या विजयाचा आकडा हा पराभवापेक्षा अधिक होणारा झाला.

१९८८ पर्यंत एकही वर्ष असं गेलं नाही की जिथे भारताच्या वाट्याला विजयापेक्षा जास्त पराभवच आले. २००९ मध्ये भारताने त्यांचा १००वा कसोटी विजय साजरा केला. तेव्हा ४३२ कसोटीनंतर भारताची कसोटीतील विजयाची टक्केवारी ही २३.१४ इतकी होती. पण, पुढील १५ वर्षांत भारतीय संघाने १४७ कसोटींत ७८ विजय मिळवले आणि ही टक्केवारी ५३.०६ वर पोहोचली. IND vs BAN 1st Test हा भारताचा ५८० वा कसोटी सामना होता आणि या विजयानंतर जय-पराजयाची आकडेवारी ही १७९-१७८ अशी झाली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताने पराभवापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत.

सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे संघ

  • ४१४ - ऑस्ट्रेलिया (८६६ सामने)

  • ३९७ - इंग्लंड (१०७७ सामने)

  • १८३ - वेस्ट इंडिज (५८० सामने)

  • १७९ - दक्षिण आफ्रिका (४६६ सामने)

  • १७९ - भारत (५८० सामने)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.