India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताने पाहुण्या बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावातील आर अश्विनच्या शतकाने आधार दिल्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत व शुभमन गिल यांची बॅट तळपली. दोघांनी शतकी खेळी केली आणि रोहित शर्माने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पण, ऋषभ व शुभमन या जोडीने २१७ चेंडूंत १६७ धावांची भागीदारी केली. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भयंकर अपघातानंतर ऋषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. ६३४ दिवसानंतर तो पहिलीच कसोटी खेळायला मैदानावर उतरला आणि त्या 'कसोटी'त तो खरा उतरला.
ऋषभने कसोटीतील सहावे शतक पूर्ण करताना महेंद्रसिंग धोनीच्या सहा कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऋषभने कसोटीत ५८ इनिंग्जमध्ये सहा शतकांचा पराक्रम केला. ऋषभ १२८ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारांसह तो १०९ धावांवर माघारी परतला. भारताला २३४ धावांवर चौथा धक्का बसला. शुभमनने १७६ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ११९ धावांची नाबाद खेळी केली. भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित करून बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले.
शतकी खेळीनंतर ऋषभचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो फलंदाजीला येण्यापूर्वी बॅटला नमस्कार करताना दिसत आहे. चाहते त्याचं कौतुक करत आहेत. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सनेही कौतुक केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.