IND vs BAN, 1st Test: आधी हसन मेहमुदची बॉलिंग अन् मग अश्विन - जडेजाच्या बॅटिंगने गाजवला पहिला दिवस

India vs Bangladesh, 1st Test, 1st Day report: भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला चेन्नईत गुरुवारी सुरुवात झाली. पहिल्या कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. पहिल्याच दिवस हसन मेहमुद, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी गाजवला.
Ravindra jadeja - R Ashwin
Ravindra jadeja - R Ashwin Sakal
Updated on

R Ashwin Century and Ravindra Jadeja Fifty: भारतीय क्रिकेट संघ जवळपास दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर अखेर गुरुवारी मैदानात उतरला. गुरुवारपासून भारताचा बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सुरू झाला आहे.

या सामन्याचा पहिला दिवस भारताकडून आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने, तर बांगलादेशकडून हसन मेहमुदने गाजवला. पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने ८० षटकात ६ बाद ३३९ धावा केल्या. अश्विन शतक करून नाबाद आहे, तर जडेजानेही नाबाद अर्धशतक झळकावले आहे.

हसन मेहमुदने दिले भारताला मोठे धक्के

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने नाणेफेक जिंकली आणि ढगाळ वातावरण पाहून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशसाठी गोलंदाजीची सुरुवातही चांगली झाली.

Ravindra jadeja - R Ashwin
IND vs BAN 1st Test Live : एक, दोन, तीन...! Virat Kohli पण गेल्याने भारतीय संघावर ओढावली नामुष्की; Hasan Mahmud ची भारी गोलंदाजी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.