पोरांनो माझ्या बॉलिंग स्टाईलची कॉपी नका करू...! Jasprit Bumrah ने का केलं असं आवाहन?

Jasprit Bumrah bowling action: जसप्रीत बुमराहने आपल्या १९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४०१ विकेट्सचा आकडा पूर्ण केला आहे.
jasprit bumrah
jasprit bumrahesakal
Updated on

Jasprit Bumrah India vs Bangladesh 1st Test: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतोय.. सध्याच्या पिढीतील सर्वात घातक गोलंदाजांपैकी तो एक आहे आणि त्यामुळेच त्याचा जगभरात चाहता वर्ग आहे. जसप्रीतच्या गोलंदाजीची युनिक स्टाईल ही युवकांच्या पसंतीत उतरली आहे. त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीचीच कॉपी करणाऱ्या युवकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण, माझ्या बॉलिंग ॲक्शनची 'कॉपी' करू नका असा सल्ला बुमराहने युवकांना दिला आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह विश्रांतीवर गेला होता आणि त्याने भारत-बांगलादेश कसोटी सामन्यातून पुनरागमन केले. त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात आपल्या गोलंदाजीचा करिष्मा दाखवला आणि चार विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. बुमराहच्या विकेटमध्ये शादमन इस्लाम, मुशफिकर रहिम, हसन महमुद आणि तस्कीन अहमद यांचा समावेश होता.

jasprit bumrah
IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत बुमराहने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात केली. बुमराहने १९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४०१ विकेट्सचा आकडा गाठला आहे. ज्यामध्ये कसोटी(१६३), वन-डे(१४९), ट्वेंटी-२०(८९) विकेट्सचा समावेश आहे. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादित १०वे स्थान मिळवले आहे.

त्याच्या बॉलिंग ॲक्शनच्या कॉपीबद्दल जस्सी म्हणाला, "मी लहानपणापासूनच जलदगती गोलंदाजीच्या प्रेमात होतो आणि टिव्हीवर ती पाहून मी गोलंदाजी शिकलो. मी पाहतो की काही मुलं माझ्या गोलंदाजीच्या बॉलिंग ॲक्शनची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. पण माझं त्यांना सांगणं आहे, की माझी कॉपी करायला जावू नका. स्वतःची वेगळी गोलंदाजीची शैली निर्माण करा. माझ्या कामगिरीने मी तुम्हाला प्रेरित करू शकलो याचा मला आनंद आहे," असे त्याने जिओ सिनेमावर बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.