India vs Bangladesh 1st Test Latest Updates: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिका गुरुवारी सुरू झाली असून पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी लोकल बॉय अश्विनने त्याच्या फलंदाजीने बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. अश्विनने या सामन्यात शतकी खेळी केली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या गोलंदाजांनी सुरूवातही चांगली केली. हसन मेहमुदने सुरुवातीला केलेल्या शानदार गोलंदाजीने भारताला दबावात आणले होते.
त्याने रोहित शर्मा (६), शुभमन गिल (०), विराट कोहली (६), ऋषभ पंत (३९) या प्रमुख फलंदाजांना बाद केले होते. तसेच केएल राहुलही १६ धावा करून बाद झाला, तर यशस्वी जैस्वालने ५६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने १४४ धावा करताना ६ विकेट्स गमावले होते.