R Ashwin slam fifty in front of his Father: भारतीय क्रिकेट संघाचा २०२४-२५ हंगाम गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) सुरू झाला आहे. गुरुवारपासून भारताची बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सुरू आहे.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी लोकल बॉय आर अश्विन त्याच्या फलंदाजीमुळे चमकला आहे. विशेष म्हणजे अश्विनचे वडीलही स्टेडियममध्ये उपस्थित होते. याशिवाय रविंद्र जडेजानेही शानदार फलंदाजी केली.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने सुरूवातही चांगली केली होती. त्यांच्याकडून वेगवान गोलंदाज हसन मेहमुदने शानदार गोलंदाजी करत भारतावरील दबाव वाढवला होता.