India vs Bangladesh 1st Test : भारत-बांगलादेश यांच्यातला पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आदी सीनियर्स खेळाडूंचा विश्रांतीचा काळ संपला आहे. आता भारताला सलग क्रिकेट खेळायचे आहे आणि त्याची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून होत आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीवर ( Virat Kohli) सर्वांचा नजरा खिळल्या आहेत. कारण, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात जे कुणालाच जमलं नाही, ते विराट करून दाखवणार आहे. त्यासाठी त्याला फक्त ५८ धावा कराव्या लागणार आहेत.