IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

Virat Kohli and Rohit Sharma Dressing Room Fun: बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीदरम्यान भारताच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची मस्ती पाहून गंभीरही हसताना दिसतोय.
Virat Kohli and Rohit Sharma Dressing Room Fun
Virat Kohli and Rohit Sharma Dressing Room FunSakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही अगदी हलकफुलकं दिसत आहे.

या सामन्यादरम्यानचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. असाच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की ड्रेसिंग रुममध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर पुढे बसले आहेत. त्यांच्या मागे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल बसले आहेत.

Virat Kohli and Rohit Sharma Dressing Room Fun
IND vs BAN 1st Test : 'भाई, इधर एक फिल्डर आएगा...'; Rishabh Pant ने बांगलादेशची फिल्डिंग सेट केली Video Viral

यावेळी गंभीरच्या मागे रोहित, विराट आणि गिलची मस्ती चालू असून ते खळखळून हसताना दिसत आहे. त्यात गंभीरही नंतर सामील झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ भारताचा पहिला डाव सुरू असतानाचा आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचं झालं तर बांगालेदशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते.

यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ११३ धावांची खेळी केली, तर रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालने ५६ धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना हसन मेहमुदने ५ विकेट्स घेतल्या.

Virat Kohli and Rohit Sharma Dressing Room Fun
IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

त्यानंतर बांगलादेशने ४७.१ षटकात सर्वबाद १४९ धावा केल्या, त्यामुळे भारताला २२७ धावांची मोठी आघाडी मिळाली. बांगालदेशकडून केवळ शाकिब अल हसन यालाच ३० धावांचा टप्पा पार करता आला. त्याने ३२ धावांची खेळी केली. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

यानंतर भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. दुसऱ्या दिवस अखेर भारताने २३ षटकात ३ बाद ८१ धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.