India vs Bangladesh Test Series Squad: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू ९० दिवसांच्या ब्रेकवर आहेत आणि १९ सप्टेंबरपासून टीम इंडियाच्या मालिकांना सुरुवात होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची लवकरच घोषणा होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद ( WTC 25) स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यात बांगलादेशचा फॉर्म लक्षात घेता भारताने त्यांना हलक्यात घेण्याची चूक करता कामा नये. या मालिकेत जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे दोन प्रमुख गोलंदाज खेळण्याची शक्यता कमी आहे, अशात २५ वर्षीय युवा जलदगती गोलंदाजाला पदार्पणाची संधी मिळू शकते.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ जय-पराजयाच्या ६८.५२ टक्क्यांसह आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया ( ६२.५०%) दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड ( ५०), बांगलादेश ( ४५.८३) आणि इंग्लंड ( ४५) हेही फायनलच्या शर्यतीत आहे. पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशने मोठी झेप घेतली आहे आणि त्यांचा फॉर्म भारताची डोकेदुखी वाढवणारा असेल.
भारतीय संघ नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहे. अशात काही मालिकांमध्ये सीनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्याची त्यांची तयारी आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर सुट्टीवरच आहे, तर शमी वन डे वर्ल्ड कप २०२३ नंतर दुखापतीमुळे बाहेर होता. त्याचे पुनरागमन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ बांगलादेशनंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या तगड्या संघांचा सामना करणार आहे आणि त्यात बुमराह-शमी जोडी दिसू शकते. अशात बांगलादेश मालिकेत या अनुभवी गोलंदाजांच्या गैरहजेरीत २५ वर्षीय जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याला पदार्पणाची संधी मिळणार आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज व मुकेश कुमार हेही या मालिकेत टीम इंडियात दिसू शकतात. अर्शदीप आणि आकाश दीप यांच्यात तिसऱ्या जागेसाठी स्पर्धा आहे, परंतु अर्शदीपला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
ऋषभ पंतही ६३४ दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. लोकेश राहुलची अशी निवड होणे अवघड आहे.
भारताचा संभाव्य संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.