Bangladesh Super Fan : बांगलादेशचा Tiger Roby 'चाप्टर' निघाला; मेडिकल व्हिसावर भारतात आला अन् उलट्या बोंबा

IND vs BAN 2nd Test Tiger Robi : भारत-बांगलादेश कानपूर कसोटी पाऊस गाजवतोय... पण, काल एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आणि ते म्हणजे बांगलादेशचा सुपर फॅन टायगर रॉबी याच्या मारहाण प्रकरण.
IND vs BAN 2nd TEst
IND vs BAN 2nd TEstesakal
Updated on

Kanpur Test Bangladesh 'super fan' Tiger Roby came india in Medical visa :

भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळही वाया गेला आहे. कानपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने ग्रीन पार्क स्टेडियम पूर्णपणे झाकले गेले आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या हॉटेलच्या दिशेने रवाना झाला आहेत, एव्हाना ते पोहोचलेही असतील. कालचा खेळ ३५ षटकांत थांबवण्यात आला होता आणि बांगलादेशच्या ३ बाद १०७ धावा झाल्या होत्या.

Robi Tiger ची चर्चा...

कालच्या पहिल्या दिवसाच्या खेळापेक्षा बांगलादेशचा सुपर फॅन टायगर रॉबी याच्या मारहाणीच्या बातमीने गाजला... कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशच्या चाहत्याला भारतीयांकडून मारहाण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला पोलिसांनी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तोपर्यंत त्याच्या मारहाणीची बातमी वाऱ्यासारखी पसरली...

IND vs BAN 2nd TEst
IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

सत्य वेगळंच...

हा बांगलादेशी फॅन रॉबी टायगर मेडिकल व्हिसावर भारतात आला आहे. त्याला टीबी आहे. टीबी हा पसरणारा आजार आहे. हा माणूस चेन्नईला गेला आणि आता कानपूरला आला. त्याच्या ड्रेसवर बांगलादेशी पेमेंट ॲपची जाहिरात आहे. तो त्याचा प्रचार करत आहे.

पोलीस काय म्हणतात...

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान टायगर नावाचा प्रेक्षक अचानक आजारी पडला. त्यांची प्रकृती खालावताच त्यांना घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी उचलून वैद्यकीय पथकाच्या मदतीने उपचारासाठी पाठवले व त्यांच्या काळजीसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात आला, आता त्यांची प्रकृती ठीक आहे. हल्ल्याबाबत सोशल मीडियावर फिरत असलेली माहिती खोटी/निराधार आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये मारामारीची कोणतीही घटना नसून ते गंभीर आजारामुळे मेडिकल व्हिसावर भारतात आले असून त्यांच्यावर कोलकाता येथे उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय स्थिती तपासली जात आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था हरीश चंदर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.