IND vs BAN 2nd Test : ५२ धावांची आघाडी अन् टीम इंडियाने केला डाव घोषित, कारण काय तर...

India vs Bangladesh 2nd Test भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावाता ९ बाद २८५ धावा करून डाव घोषित केला.
India vs Bangladesh
India vs Bangladesh esakal
Updated on

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावाता ९ बाद २८५ धावा करून डाव घोषित केला. कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेले. त्यानंतर चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या भारताने ५२ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला.

पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकांत थांबवण्यात आला होता आणि तो थेट सुरू झाला चौथ्या दिवशी. बांगलादेशकडून मोमिनूल हकने १९४ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह १०७ धावांची नाबाद खेळी केली. पण, संपूर्ण संघ २३३ धावांत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, आकाश दीप व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

India vs Bangladesh
IND vs BAN 2nd Test: चूक झाली भावा! Virat Kohli संतापलेला पाहून Rishabh Pant ने मारली मिठी Video

प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. यशस्वीने ५१ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह ७२ धावांची खेळी केली. रोहितने ११ चेंडूंत २३ धावा चोपल्या. यशस्वी-रोहितने ३ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. त्यानंतर यशस्वी व शुभमन गिल यांनी १०.१ षटकांत शतकी पल्ला गाठला. शुभमनने ३९ धावांची खेळी केली. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी ८५ धावांची भागीदारी केली. विराट ३५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४७ धावांवर बाद झाला.

लोकेश राहुलने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने ४३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा ( ८) व आर अश्विन ( १) यांना बांगलादेशच्या गोलंदाजांनी झटपट बाद केले. आकाश दीपने दोन खणखणीत षटकार खेचून ५ चेंडूंत १२ धावा चोपल्या. त्याच्या विकेटनंतर रोहितने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताने ९ बाद २८५ धावा करून ५२ धावांची आघाडी घेतली.

India vs Bangladesh
IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाचे 'कसोटी' ४ वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा भारी खेळ कोणाला जमणार नाही

भारतानं असं का केलं?

कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्याने सामन्याचा निकाल लागणे अवघड आहे. पण, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय हवा आहे. त्यामुळे भारताने आज कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल फलंदाजी केली आणि झटपट आघाडी घेतली. भारताकडे उद्याचा दिवस आहे आणि बांगलादेशला दुसऱ्या डावात गुंडाळून टीम इंडियाचा विजय मिळवण्याचा डाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.