IND vs BAN 2nd Kanpur Test: टीम इंडियाने टॉस जिंकला, १९६४ नंतर धाडसी निर्णय घेणारा Rohit Sharma पहिलाच कर्णधार ठरला

India vs Bangladesh 2nd Test Updates: भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला विलंबाने सुरुवात होणार आहे. पावसामुळे खेळपट्टी ओली असल्याने एक तास उशीरा सामना सुरू होणार आहे.
IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd Test esakal
Updated on

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : पहिली कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2023-25) अव्वल स्थानावरील पकड भारताने मजबूत केली आहे. बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून कानपूर येथे सुरू होणार आहे आणि ती जिंकून फायनलचं तिकीट पटकावण्याची टीम इंडियाला संधी आहे. पण, पावसामुळे सामन्याला विलंब झाला आहे. कानपूर येथे काल पावसाने बॅटिंग केली आणि खेळपट्टी ओली असल्याने सामना एक तास उशीराने सुरू होणार आहे.

कानपूर कसोटीच्या खेळपट्टीसाठी काळी माती वापरली गेली आहे. त्यामुळे चेन्नईच्या तुलनेत ( लाल माती) कानपूरच्या खेळपट्टीवर जास्त बाऊन्स मिळणार नाही. ग्रीन पार्कची खेळपट्टी चेन्नईच्या खेळपट्टीपेक्षा सपाट असेल आणि कसोटी जसजशी पुढे सरकेल तसा बाऊन्सही कमी होईल. कानपूरची खेळपट्टी संथ असण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही संघ आपली रणनीती बदलण्याचा अंदाज होता.

IND vs BAN 2nd Test
R Ashwin Cricketing Story : मध्यमगती गोलंदाज कसा बनला जगातील दिग्गज ऑफ स्पिनर? आर अश्विनच्या प्रवासाची गोष्ट

खेळपट्टीची ९.३० वाजता पाहणी केल्यानंतर १० वाजता नाणेफेक झाली आणि १०.३० वाजता मॅच सुरूर होणार असल्याचे BCCI ने जाहीर केले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. १९६४ नंतर रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला की ज्याने कानपूर कसोटीत नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धींना प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. यापूर्वी १९६४ मध्ये पतौडी ज्युनियर यांनी इंग्लंडविरुद्ध असा निर्णय घेतला होता. दरम्यान, भारताच्या संघात आज बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याच प्लेइंग इलेव्हनसह टीम उतरली.

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह

बांगलादेशचा संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, हसन महमूद, सय्यद खालेद अहमद,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.