IND vs BAN, 2nd Test: मोमिनुलचं शतक, पण भारतीय गोलंदाजांनीही राखलं वर्चस्व; बांगलादेश पहिल्या डावात ऑलआऊट

Bangladesh 1st Inning against India at Kanpur Test: भारतीय क्रिकेट संघाने कानपूर कसोटीत चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशचा पहिला डाव संपवला. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसह क्षेत्ररक्षकांचीही कामगिरी शानदार राहिली.
Team India
Team IndiaSakal
Updated on

India vs Bangladesh, 2nd Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाच्या अडथळ्यामुळे खेळ होऊ शकला नव्हता.

अखेर चौथ्या दिवशी संघ मैदानात उतरले. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशचा पहिला डाव ७४.२ षटकात २३३ धावांवर संपला.

पहिल्या दिवशी ३५ षटकांनंतर सामना थांबला होता. त्यावेळी बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. तसेच मोमिनुल ४० धावांवर, तर मुश्फिकूर रहिम ६ धावांवर नाबाद होता.

याच धावसंख्यावरून चौथ्या दिवसाचा खेळ पुढे सुरू झाला. पण मुश्फिकूरला जसप्रीत बुमराहने फार काळ टिकू दिलं नाही. त्याने ४१ व्या षटकात त्याला ११ धावांवर त्रिफळाचीत केले.

Team India
IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

त्यानंतर लिटन दासनेही मोमिनुलची साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु ५० व्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने हवेत उडी मारत एका हाताने अफलातून झेल घेतला आणि लिटन दासला १३ धावांवर माघारी धाडले.

शाकिब अल हसनही फार काही करू शकला नाही. ९ धावांवर खेळत असताना त्याचा झेल मोहम्मद सिराजने आर अश्विनच्या गोलंदाजीवर घेतला. पण नंतर मेहदी हसन मिराजने एक बाजू खंबीरपणे सांभाळणाऱ्या मोमिनुलची साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान, मोमिनुलने शतकही पूर्ण केले.

दरम्यान मोमिनुल आणि मेहदी हसन मिराजची भागीदारीही बुमराहनेच तोडली. त्याने मेहदी हसन मिराजला शुभमन गिलच्या हातून २० धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या तैजुल इस्लामलाही बुमराहने ५ धावांवर माघारी धाडले. यानंतर बांगलादेशची खालची फळी काही करू शकली नाही.

Team India
IND vs BAN, 2nd Test: मैदान खेळण्यास तयार नाही! तिसऱ्या दिवसाचा खेळही झाला रद्द; BCCI ने दिले अपडेट्स

हसन मेहमुलदा सिराजने पायचीत केले, तर ७५ व्या षटकात रविंद्र जडेजाने आपल्याच गोलंदाजीवर खलीद अहमदचा झेल घेत बांगलादेशचा डाव संपवला. जडेजाने या विकेटबरोबरच त्याचे ३०० कसोटी विकेट्सही पूर्ण केले. दरम्यान, मोमिनुल मात्र दुसऱ्या बाजूने नाबाद राहिला. त्याने १९४ चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १७ चौकार आणि १ षटकार मारला.

भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.