Team India for 2nd Test : भारताने विजय मिळवला, BCCI ने दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला; वाचा काय बदल झाला

BCCI Announced Team India for 2nd Test vs BAN : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत २८० धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे.
India vs Bangladesh
India vs Bangladesh esakal
Updated on

India vs Bangladesh squad for 2nd Test against Bangladesh Marathi : भारतीय संघाने चेन्नई कसोटी चौथ्या दिवशी जिंकली. आता दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवली जाणार आहे आणि त्यासाठी BCCI ने संघ जाहीर केला. पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल या सीनियर खेळाडूंना अपयश आले. त्याचवेली आर अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, शुभमन गिल व यशस्वी जैस्वाल यांनी दमदार कामगिरी करून दाखवली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत संघात काही बदल पाहायल मिळतील अशी अपेक्षा होती. भारताने चेन्नई कसोटी चौथ्या दिवशी जिंकल्यानंतर BCCI ने संघ जाहीर केला.

भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ २३४ धावांत तंबूत परतला. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या R Ashwin ने चौथ्या डावात २१-०-८८-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. शुभमन गिल व ऋषभ पंत यांनीही भारताच्या दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीचे योगदानही या सामन्यात राहिले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विश्रांतीवरून जसप्रीत बुमराह मैदानावर उतरला आणि त्याने चांगली कामगिरी केली. पण, आगामी महत्त्वाच्या मालिका लक्षात घेता बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते, असा अंदाज होता. भारताला न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाची कसोटी मालिका खेळायची आहे. पण, बुमराह संघात कायम आहे. बीसीसीआये आज जाहीर केलेल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

India vs Bangladesh
IND vs BAN 1st Test : ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं; Team India साठी ठरला ऐतिहासिक विजय

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ:  रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.