Jasprit Bumrah चा BCCIकडून गेम; कसोटी संघात घेतलं खरं, पण...; कुणाच्याही हे लक्षात नाही आलं

Indian Squad for 1st Test vs Bangladesh: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या कसोटी संघात ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. पण, जलदगती गोलंदाजाकडून महत्त्वाची जबाबदारी काढून घेतली गेली आहे.
Jasprit Bumrah VC
Jasprit Bumrah VC esakal
Updated on

IND vs BAN 1st Test: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भारतीय संघाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू होत आहे. WTC गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तानला धुळ चारून बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे India vs Bangladesh Test Series ला खूप महत्त्व आहे. १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे आणि त्यासाठी BCCI ने काल १६ सदस्यीय संघ जाहीर केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जलदगती गोलंदाज Jasprit Bumrah कसोटी मालिकेतून पुनरागमन करणार आहे. त्याचा आनंद व्यक्त केला जात आहेच, परंतु BCCI ने त्याचवेळी त्याचा गेम केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Who is vice deputy in the IND vs BAN Test series?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी मालिकेत खेळण्यासाठी १९ सप्टेंबरला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उतरणार आहे. पण, BCCI ने जाहीर केलेल्या संघात उप कर्णधार कोणच नाही. बीसीसीआयने जसप्रीत बुमराहकडून ही जबाबदारी काढून घेतल्याची चर्चा आता रंगत आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत जसप्रीत टीम इंडियाचा उप कर्णधार होता. पण, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीच्या संघात बीसीसीआयने उप कर्णधार म्हणून कोणाचेच नाव दिलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Jasprit Bumrah VC
IND vs BAN 1st Test: Shreyas Iyer, मोहम्मद शमी यांना कसोटी संघात का नाही मिळालं स्थान? जाणून घ्या Inside Story

बीसीसीआयने ट्वेंटी-२० व वन डे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवली आहे. पण, कसोटी क्रिकेटसाठी या पदाच्या शर्यतीत अनेक मोठी नावं असल्याने BCCI ने त्याबाबत घोषणा केली नाही. त्यामुळे जरी जसप्रीतचे नाव उप कर्णधार म्हणून अधिकृत जाहीर केले नसले तरी तो आगामी मालिकेत रोहितला उप कर्णधार म्हणूनच मदत करेल.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

Jasprit Bumrah VC
Jasprit Bumrah VCesakal

Who will be India’s next Test captain?

रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद दिले गेले. रोहित वन डे व कसोटी संघाचा कर्णधार आहे, परंतु तो पुढील १-२ वर्षच खेळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताचा पुढील कर्णधार कोण, हा प्रश्न साहजिक आहे. याबाबत बीसीसीआयने अजून चर्चा सुरू केलेली नाही. रोहित २०२७च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपर्यंत कर्णधारपदावर कायम दिसेल. २०२७चा वन डे वर्ल्ड कप ही रोहितसाठी कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा असू शकते. तोपर्यंत पुढील कर्णधाराच्या प्रश्नावर बीसीसीआय मौन साधताना दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.