बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर आला असून भारताविरुद्ध १९ सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे.
दरम्यान, यातील केवळ पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे.
आता अशी माहिती समोर येत आहे की न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने अनेक खेळाडूंना टी२० मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. यातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा, हे तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.