IND vs BAN Test : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; पाकिस्तानला लोळवले अन् आता...

Bangladesh squad against India: बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तानला घरात घुसून लोळवले होते. आता बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे आणि २ कसोटी मालिकेच्या सामन्यासाठी त्यांनी आज तगडा संघ जाहीर केला.
Bangladesh squad against India
Bangladesh squad against Indiaesakal
Updated on

India vs Bangladesh Test Series: पाकिस्तानला घरात घुसून पराभूत करणारा बांगलादेशचा संघ भारता दौऱ्यावर येतोय.. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि आज १६ सदस्यीय संघ जाहीर केला गेला. बांगलादेशने अनकॅप्ड फलंदाज जाकर अली अनिकचा संघात समावेश केला आहे, तर वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम याला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नाही.

बांगलादेश कसोटी संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक

Bangladesh squad against India
IND vs BAN 1st Test : BCCI चा निर्णय अन् KL Rahul ची अंतिम ११ मधील जागा पक्की; अन्य १० जणं कोण?

भारतीय संघ ( पहिल्या कसोटीसाठी) - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.