India's Test squad for Bangladesh Series: पाकिस्तानविरूद्धच्या दणदणीत विजयानंतर बांग्लादेश संघ १९ सप्टेंबर पासून २ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे भारत-बांग्लादेश मालिकेची उत्सुकता आणखीणच वाढली आहे. १२ सप्टेंबरपासून चेपॉक येथे भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सराव सुरू करणार आहे. १५ दिवसांवर मालिका आली असूनही अद्याप भारतीय कसोटी संघाची घोषणा झालेली नाही.
पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात शादमन इस्लाम (९३/१८३), मोनिमूल हक (५०/७६), मुश्फिकर रहिम(१९१ ३४१), लिटन दास (५६/७८), मेहदी हसन (७७/१७९) तर दुसऱ्या सामन्यात लिटन दास (१३८/२२८), मेहदी हसन (७८/१२४) यांनी मोठी खेळी केली. आता हे खेळाडू भारताची किती डोकेदुखी वाढवतात, हे येणारी मालिकाच सांगेल.
पहिल्या सामन्यात एकूण ४ विकेट्स घेणारा गोलंदाज शाकिब अल हसन, ५ विकेट्स घेणारा मेहदी हसन, तर दुसऱ्या सामन्यात एकूण ४ विकेट्स घेणारा तस्किन अहमद, ५ विकेट्स घेणारा नहीद राणा, ५ विकेट्स घेणारा मेहदी हसन, ५ विकेट्स घेणारा हसन महमद यांच्या कामगिरीकडे भारतीय फलंदाजांना दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतीय संघाचे आगामी कसोटी वेळापत्रक व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी आगामी कसोटी मालिका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. भारतीय कसोटी संघ निवडीच्या स्पर्धेत दिग्गज, अनुभवी व युवा खेळाडू असल्याने निवड समितीसमोर मोठे आव्हान असेल.
५ सप्टेंबरपासून बंगळूरू आणि अनंतपूर येथे दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ८ सप्टेंबर पर्यंत दुलीप ट्रॉफी स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण होणार असून पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.