India vs Bangladesh 1st Test: भारत विरुद्ध बांगालदेश संघात गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा गोलंदाज हसन मेहमुदने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने भारताच्या प्रमुख खेळाडूंना बाद करत बांगलादेशला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ढगाळ वातावरण असल्याने शांतोने गोलंदाजीसाठी हसनला समर्थन दिले. त्यानेही हा विश्वास कायम ठेवताना आधी कर्णधार रोहित शर्माला ६ व्या षटकात ६ धावांवर, तर आठव्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या शुभमन गिलला शुन्यावरच बाद केले.
इतकेच नाही तर १० व्या षटकात विराट कोहलीलाही त्याने चकवले आणि ६ धावांवर माघारी धाडले. यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने डाव सावरला होता. त्यांनी ६२ धावांची भागादारीही केली. पण अखेर ही जोडीही हसन मेहमुदनेच तोडली.