भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 33 धावांवरून दिवसअखेर 5 बाद 326 धावा केल्या. रोहित शर्माने 131 धावांची शतकी खेळी केली. तर रविंद्र जडेजाने नाबाद 110 धावा केल्या. रोहित आणि जडेजाने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. सर्फराज खानने 66 चेंडूत 62 धावा ठोकत भारताला पहिल्या दिवशीच 300 पार पोहचवले. सर्फराज आणि जडेजाने पाचव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. त्यात 62 धावांचे योगदान एकट्या सर्फराजचे होते.
रविंद्र जडेजाने झुंजार शतक ठोकत भारताला पहिल्या डावात सावरण्याचं काम केलं. मात्र तो 99 धावांवर असताना एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गोंधळ निर्माण झाला अन् सर्फराज खान 62 धावांवर बाद झाला.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजासोबत चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. मात्र 131 धावांवर असताना मार्क वूडने त्याला बेन स्टोक्स द्वारे झेलबाद केलं. रोहित बाद झाला त्यावेळी भारताच्या 237 धावा झाल्या होत्या.
रोहित शर्माने 157 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 11वे शतक होते. त्याने रवींद्र जडेजासोबत दीडशेहून अधिक धावांची भागीदारीही केली आहे.
भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा आहे. रोहित 102 तर जडेजा 67 धावा करून क्रीजवर आहे.
रोहितने जुलै 2023 नंतर कसोटीतील पहिले शतक झळकावले आहे. त्याचे यापूर्वीचे शतक जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आले होते. त्याने विंडसर पार्कवर 103 धावांची खेळी खेळली.
भारताने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चहापानापर्यंत 3 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली. खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा 97 धावा करून नाबाद होता तर रविंद्र जडेजाच्या 68 धावा झाल्या आहेत.
भारताची अवस्था 3 बाद 33 धावा अशी झाली असताना बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन झालेल्या रविंद्र जडेजाने अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि जडेजाने चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत संघाला 150 च्या पार नेले.
रविंद्र जडेजा आणि रोहित शर्माने चौथ्या विकेटसाठी 100 ची भागीदारी रचली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. भारताने 123 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 64 धावा केल्या आहेत तर जडेजा 40 धावा करून खेळत आहे.
लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात तीन गडी गमावून 93 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 52 धावांवर नाबाद असून रवींद्र जडेजा 24 धावांवर नाबाद आहे. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 60 धावांची भागीदारी झाली आहे.
यशस्वी जैस्वाल (10), शुभमन गिल (0) आणि रजत पाटीदार (5) यांच्या रूपाने टीम इंडियाला तीन धक्के बसले आहेत. मार्क वुडने दोन आणि टॉम हार्टलीने एक विकेट घेतली.
राजकोटमध्ये रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सांभाळला आहे. यावेळी रोहितने 71 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर रजत पाटीदारही पॅव्हेलियनमध्ये परतला आहेत. वुडने यशस्वी आणि शुभमनला बाद केले, तर टॉम हार्टलीने रजतला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यशस्वी 10 धावा करून, शुभमन खाते न उघडता आणि रजत पाच धावा करून बाद झाला. आता मधल्या फळीत सर्फराज आणि ध्रुवच्या रूपाने दोन पदार्पण करणारे खेळाडू आहेत. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या तासात तीन गडी बाद करत संघाने वर्चस्व दाखवले आहे.
राजकोटच्या या मैदानावर मार्क वुडचा कहर पाहिला मिळत आहे. पहिल्या दिवशी पहिल्या अर्धा तासात त्याने भारताला दुसरा धक्का दिला. त्याने आधी यशस्वीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर शुभमन गिलही आऊट केले. शुभमन खाते उघडू शकला नाही.
सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.
पहिल्या डावात 22 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. मार्क वुडने यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्याला 10 धावा करता आल्या. सध्या शुबमन गिल आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संघात चार बदल करण्यात आल्याचे कर्णधाराने सांगितले. सर्फराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर अक्षर आणि मुकेश कुमार यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या कसोटीत खेळला नव्हता. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा 100 वा कसोटी सामना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.