Ind vs Eng 3rd Test Day 2 : बेन डकेटची हाणामारी! भारताच्या 445 धावांना इंग्लंडनेही दिलं चोख प्रत्युत्तर

India Vs England 3rd Test Day 1 Live Scorecard Updates News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये खेळला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे....
Ind vs Eng 3rd Test Day 2 : बेन डकेटची हाणामारी! भारताच्या 445 धावांना इंग्लंडनेही दिलं चोख प्रत्युत्तर
Updated on

India vs England 3rd Test Day 1 Live Score Updates :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने 46 धावांची खेळी करत दुसरा दिवस यादगार केला.

मात्र इंग्लंडच्या बेन डकेटने दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात नाबाद 133 धावा करत सर्व फोकस आपल्याकडे वळवला. बॅझबॉल क्रिकेटचा नमुना पेश करत 35 षटकातच 207 धावा केल्या.

Ind vs Eng 3rd Test Day 2 : बेन डकेटची हाणामारी! भारताच्या 445 धावांना इंग्लंडनेही दिलं चोख प्रत्युत्तर

भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्यानंतर इंग्लंडने देखील चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात 2 बाद 207 धावा केल्या. बेन डकेटने तर 118 चेंडूत 133 धावा चोपल्या. इंग्लंड अजूनही 238 धावांनी पिछाडीवर आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : सिराजने जोडी फोडली, डकेट अजूनही देतोय टेन्शन

सलामीवीर बेन डकेट आणि ओली पोप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी सिराजने फोडली. त्याने पोपला 39 धावांवर बाद केलं.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : बेन डकेटचं बॅझबॉल! 88 चेंडूत शतक ठोकत भारताचं वाढवलं टेन्शन

अश्विनने झॅक क्राऊलची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला असला तरी दुसरा सलामाीवीर बेन डकेटने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 88 चेंडूत 100 धावा ठोकत इंग्लंडला 148 धावांपर्यंत पोहचवले.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : क्राऊली ठरला अश्विनचा 500 वी शिकार

अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राऊलीला 8 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. अश्विनची ही 500 वी कसोटी विकेट आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : बेन डकेटचे आक्रमक अर्धशतक, इंग्लंडने पहिल्या डावात केली धडाकेबाज सुरूवात

इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी नेहमीप्रमाणे झंजावाती सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पहिल्या 10 षटकात 6.7 च्या रनरेटने 67 धावा केल्या. त्यात बेन डकेटचे 50 धावांचे योगदान होते.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : चहापानापर्यंत इंग्लंडच्या बिनबाद 31 धावाी

इंग्लंडने चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 31 धावा केल्या होत्या. बेन डकेट 19 तर 6 धावा करून नाबाद होते.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : टीम इंडियाचा 445 वर पहिला डाव खल्लास! ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले, शेवटी बुमराहचा तडाखा

भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपला आहे आज भारताने पाच विकेट्सवर 326 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 119 धावा जोडण्यासाठी उर्वरित पाच विकेट गमावल्या.

पहिल्या अर्ध्या तासात टीम इंडियाने कुलदीप यादव (4) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर रविचंद्रन अश्विनने ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रेहान अहमदने मोडली.

त्याने आधी अश्विन (37) आणि नंतर ध्रुव जुरेल (46) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जसप्रीत बुमराहने सिराजसोबत 10व्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. वुडने बुमराहला बाद केले आणि भारतीय डाव 445 धावांवर आटोपला.

इंग्लंडकडून वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रेहानला दोन विकेट्स मिळाल्या. जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : पदार्पण सामन्यात ध्रुव जुरेलचे अर्धशतक हुकले, भारताला नववा धक्का

भारताला 415 धावांवर नववा धक्का बसला आहे. रेहान अहमदने ध्रुव जुरेलला झेलबाद केले. त्याला 46 धावा करता आल्या. सध्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : 408 धावांवर भारताची पडली भारताची आठवी विकेट, अश्विन 37 धावा करून आऊट

भारताला 408 धावांवर आठवा धक्का बसला आहे. रेहान अहमदच्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. त्याला 37 धावा करता आल्या. अश्विनने ध्रुव जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी 175 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात घडल्या नाट्यमय घडामोडी! अर्धा तासात दोन धक्के पण नंतर...

दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 388 धावा केल्या होत्या. सध्या रविचंद्रन अश्विन 25 धावांवर आणि ध्रुव जुरेल 31 धावांवर खेळत आहे.

आज भारताला दोन धक्के बसले. कुलदीप यादव चार धावा करून जेम्स अँडरसनचा बळी ठरला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने जो रूटला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. 225 चेंडूत 112 धावा करून तो बाद झाला.

हे दोन्ही धक्के आजच्या पहिल्या अर्ध्या तासात भारताला बसले. म्हणजेच यानंतर अश्विन-जुरेल यांनी सुमारे दीड तास फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. आतापर्यंत दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 133 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली आहे.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : ध्रुव जुरेल अन् आर अश्विन सांभाळली संघाची धूरा! भारताची धावसंख्या 350 पार...

सात गडी गमावून भारताने 350 हून अधिक धावा केल्या आहेत. अश्विन 11 धावा करून क्रीजवर आहे तर ध्रुव जुरेलने 10 धावा केल्या आहेत. आज भारताला दोन धक्के बसले. कुलदीप चार तर जडेजा 112 धावा करून बाद झाला.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासात भारताला दोन मोठे धक्के...! शतकवीर जडेजा तंबुत

दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासात भारताला दोन धक्के बसले आहेत. अँडरसनने कुलदीप यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जो रूटने रवींद्र जडेजाचा आऊट केले. जडेजाने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. सध्या रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 3rd Test Day 2 Live Score : दिवसाच्या तिसऱ्या षटकात टीम इंडियाला मोठा धक्का!

भारताला आज पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला आहे. दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या षटकात अँडरसनने कुलदीपला आऊट केले. कुलदीपला 24 चेंडूत चार धावा करता आल्या. सध्या पदार्पण करणारा ध्रुव जुरेल जडेजाला साथ देण्यासाठी क्रीझवर आला आहे.

Ind vs Eng Test : राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काय घडलं?

उत्तम खेळपट्टी, त्यात प्रथम फलंदाजीची संधी, तरीही ३ बाद ३३ अशी घसरगुंडी...या अवस्थेनंतर रोहित शर्मा (१३१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १००) यांनी द्विशतकी भागीदारी करून डाव सावरला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३ बाद ३३ वरून डाव सावरला ; रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.