भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 322 धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 2 बाद 196 धावा झाल्या होत्या. यशस्वी जैस्वालने (104 रिटायर्ड हर्ट) शतकी तर शुभमन गिलने (नाबाद 65 धावा) अर्धशतकी खेळी केली.
तत्पूर्वी भारताने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर संपवला. भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक मारा करत 4 विकेट्स घेतल्या तर इंग्लंडच्या बेन डकेटने 153 धावांची धडाकेबाज खेळी केली.
यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर आलेला रजत पाटीदार 10 चेंडूत शुन्यावर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने कुलदीप यादवला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं.
133 चेंडूत 104 धावांची शतकी खेळी करणारा यशस्वी जैस्वाल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला अवघे काही षटके शिल्लक असताना रिटायर्ड हर्ट झाला. त्याची पाठ दुखू लागल्याने तो पॅव्हिलियनमध्ये परतला.
यशस्वी जैस्वालच्या शतकानंतर शुभमन गिलने देखील आपले अर्धशतक पूर्ण करत भारताची आघाडी 300 पार पोहचवली.
यशस्वी जैस्वालने 122 चेंडूत शतक ठोकले. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची नाबाद भागीदारी रचत संघाची आघाडी 290 धावांपर्यंत पोहचवले.
यशस्वी जैस्वालने चहापानानंतर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने दमदार अर्धशतक ठोकत भारताची आघाडी 250 च्या जवळ पोहचवली.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने भागीदारी रचत भारताची आघाडी 200 पार पोहचवली.
भारताने आपल्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत 1 बाद 44 धावा करत आघाडी 170 धावांवपर्यंत पोहचवली. खेळ थांबला त्यावेळी यशस्वी जैस्वाल 19 तर शुभमन गिल 5 धावा करून नाबाद होते.
भारताने पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेतली. भारताने आपला दुसरा डाव सुरू करत आघाडी झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताच्या फलंदाजांना प्रत्येक धावेसाठी झुंजवले. यादरम्यानच रोहित शर्मा 28 चेंडूत 19 धावा करत बाद झाला.
इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यामुळे टीम इंडिया दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीसाठी उतरेल.
आज इंग्लंडने 2 बाद 207 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 112 धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या दोन सत्रात बाद झाला.
शुक्रवारी जेव्हा बेन डकेट आणि जो रुट फलंदाजी करत होते तेव्हा इंग्लिश संघ इतक्या कमी धावसंख्येवर ऑलआऊट होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. भारताकडून सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराह-अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
314 धावांवर इंग्लंडला आणखी दोन धक्के बसले. सिराजने रेहान अहमदला क्लीन बोल्ड केले. त्याला सहा धावा करता आल्या. पुढच्याच षटकात जडेजाने टॉम हार्टलीला यष्टिचित केले.
लंच-ब्रेकनंतर सलग दोन चेंडूंत इंग्लंडला दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडच्या डावाच्या 65 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला आऊट केले. त्याला 41 धावा करता आल्या.
पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर म्हणजेच 66व्या षटकात मोहम्मद सिराजने बेन फॉक्सला झेलबाद केले. फॉक्स 13 धावा करून बाद झाला.
इंग्लंडची धावसंख्या सध्या सात विकेट्सवर 300 धावा आहे. टॉम हार्टले आणि रेहान अहमद क्रीजवर आहेत. इंग्लिश संघ अजूनही भारताच्या 145 धावांनी मागे आहे.
तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे.
लंच-ब्रेकपर्यंत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात पाच गडी गमावून 290 धावा केल्या होत्या. कर्णधार बेन स्टोक्स 39 धावांवर तर बेन फॉक्स 6 धावांवर नाबाद आहे.
अश्विनशिवाय चार गोलंदाजांसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आजच्या पहिल्या सत्रात त्याची उणीव भासली नाही. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने 26 षटकांत 83 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी तीन बळी घेतले. यात जसप्रीत बुमराहच्या एका विकेटचा आणि कुलदीपच्या दोन विकेटचा समावेश आहे.
बुमराहने रूटला (18) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी कुलदीपने बेअरस्टोला खाते उघडू दिले नाही. शतकवीर बेन डकेटलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डकेट 153 धावा करून बाद झाला. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. या बाबतीत इंग्लिश संघ अजूनही 155 धावांनी मागे आहे.
इंग्लंडला 260 धावांवर पाचवा धक्का बसला आहे. कुलदीप यादवच्या फिरकीची जादू काम करत आहे. त्याने एका खराब बॉलवर बेन डकेटला आऊट केले. डकेटने 151 चेंडूत 153 धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 23 चौकार आणि दोन षटकार मारले. सध्या बेन स्टोक्स आणि बेन फॉक्स क्रीजवर आहेत.
आज इंग्लंडने सलग दोन षटकात दोन विकेट गमावल्या आहेत. इंग्लिश डावाच्या 40व्या षटकात बुमराहने जो रूटला बाद केले होते. कुलदीप यादवने 41व्या षटकात जॉनी बेअरस्टोला एलबीडब्ल्यू आऊट केले. रूट 18 धावा करू शकला, तर बेअरस्टो खातेही उघडू शकला नाही. या मालिकेत दोन्ही खेळाडूंचा खराब फॉर्म कायम आहे. इंग्लंडची धावसंख्या चार विकेटवर 225 धावा आहे.
इंग्लंडला 224 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लिश संघाला हा पहिला धक्का आहे. जसप्रीत बुमराहने जो रूटला आऊट केले. खरं तर जो रूट रिव्हर्स लॅपचा प्रयत्न करत होता पण स्लिपमध्ये यशस्वीने मस्त झेल घेतला. बुमराहने रुटला कसोटीत नवव्यांदा आऊट केले. रूटचा खराब फॉर्म सुरूच आहे. आत्तापर्यंत तो या मालिकेत विशेष काही करू शकलेला नाही.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. बेन डकेट आणि जो रूट क्रीजवर आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेणारा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन .....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.