Ind vs Eng : रन आऊट झाल्यानंतर शुभमन गिल संतापला! कुलदीप यादवच्या 'त्या' चुकीमुळे इतक्या धावांनी हुकले शतक

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे.
shubman gill run out and missed century kuldeep yadav mistake news in marathi
shubman gill run out and missed century kuldeep yadav mistake news in marathi SAKAL
Updated on

India vs England 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा फलंदाज शुभमन गिल रन आऊट झाला. कुलदीप यादव त्या चुकीमुळे गिल धावबाद झाला.

नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या कुलदीपने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला गिलला चांगली साथ दिली. मात्र त्याच्या एका चुकीमुळे गिल 91 धावांवर धावबाद झाला. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच धावबाद आहे. या धावबादनंतर गिल चांगलाच संतापलेला दिसला.

shubman gill run out and missed century kuldeep yadav mistake news in marathi
R Ashwin Ind vs Eng : BCCI ची मोठी घोषणा! अश्विनची राजकोट कसोटी ताफ्यात पुन्हा एन्ट्री

शुभमन गिलच्या धावबादबद्दल बोलायचे तर, ही घटना भारतीय डावाच्या 64 व्या षटकात घडली. टॉम हार्टलीच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपला मोठा शॉट मारायचा होता, पण तो चेंडूला बॅटवर नीट आला नाही. आणि चेंडू थेट मिड-विकेटवर उभा असलेला इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या हातात गेला.

कुलदीप यादवने आधी एक धाव घेण्यासाठी आवाज दिला, त्यावर गिलही धावला, पण नंतर त्याने धाव घेण्यास नकार दिला. गिल जवळपास अर्ध्या विकेटमध्ये आला होता, तिथून तो परत फिरला, पण स्टोक्सने केलेल्या चांगल्या थ्रोमुळे तो धावबाद झाला. या रनआऊटनंतर गिल चांगलाच संतापलेला दिसत होता.

shubman gill run out and missed century kuldeep yadav mistake news in marathi
Mike Procter Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कुलदीप यादव नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला होता, अशा परिस्थितीत त्याने विकेटचा त्याग केला असता तर बरे झाले असते. गिलचे असे धावबाद होणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.