Ind vs Eng 4th Test Day : पहिला दिवस जो रूटचा! शतक ठोकत इंग्लंडला पोहचवले चांगल्या स्थितीत

India vs England 4th Test Day 1 Live Scorecard Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे खेळला जात आहे.
India vs England 4th Test Day
India vs England 4th Test Day esakal
Updated on

Ind vs Eng 4th Test Day 1 : पहिला दिवस जो रूटचा! शतक ठोकत इंग्लंडला पोहचवले चांगल्या स्थितीत

India vs England 4th Test Day 1 Live Score : रांची येथील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आकाश दीपने सुरूवातीला इंग्लंडला धक्के दिल्याने त्यांची अवस्था 3 बाद 57 धावा अशी झाली होती. मात्र जो रूटने झुंजार शतक ठोकत इंग्लंडचा डाव सावरला.

रूटने दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडला 302 धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडकडून रूटने नाबाद 106 धावा तर झॅक क्राऊलीने 42 आणि बेन फोक्सने 47 धावांची खेळी केली. त्यानंतर ओली रॉबिन्सनने नाबाद 31 धावा करत रूटला चांगली साथ दिली. भारताकडून आकाश दीपने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : अखेर जो रूटची बॅट तळपली, शतक ठोकत इंग्लंडचा डाव सावरला

इंग्लंडचा फलंदाज जो रूट संपूर्ण मालिकेत चमकला नव्हता. मात्र महत्वाच्या चौथ्या सामन्यात 31 वे कसोटी शतक ठोकत इंग्लंडला 250 धावांच्या पुढे नेले.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : सिराजने इंग्लंडला दिला सातवा धक्का 

मोहम्मद सिराजने इंग्लंडला सातवा धक्का दिला. त्याने टॉम हार्टलीला 13 धावांवर बाद केलं.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : मोहम्मद सिराजने फोडली जोडी, फोक्स 47 धावा करून बाद

जो रूट आणि बेन फोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. अखेर ही भागीदारी मोहम्मद सिराजने फोडली. त्याने 126 चेंडूत 47 धावा करणाऱ्या फोक्सला बाद केलं.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : इंग्लंडसाठी जो रूटला धावून... ठोकले मालिकेतील पहिले अर्धशतक

इंग्लंडने पाच गडी गमावून 176 धावा केल्या आहेत. रुटने या मालिकेतील पहिले अर्धशतक 108 चेंडूत पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 61 वे अर्धशतक होते. रुटने बेन फॉक्ससोबत 60 हून अधिक धावांची भागीदारीही केली आहे. इंग्लंडची पाचवी विकेट 112 धावांवर पडली होती.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू

दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहेत. इंग्लंडची धावसंख्या पाच विकेटवर 129 धावा आहे. जो रूट 27 धावा करून क्रीजवर असून बेन फॉक्सने सहा धावा केल्या आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : लंच बेक्रपर्यंत मोठी उलथापालथ! इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत, पदार्पण सामन्यात आकाश दीपचा कहर

पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 5 गडी गमावून 112 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खुपच खराब झाली. आकाशने त्याच्या दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. मात्र, तो चेंडू नो बॉल ठरला.

पण आकाशने हार मानली नाही. आणि त्यानंतर त्याने बेन डकेटला आऊट केले. डकेट 11 धावा करू शकला. यानंतर त्याच षटकात त्याने ऑली पोपला एलबीडब्ल्यू आऊट केले. पोप खाते उघडू शकले नाहीत. एका षटकात दोन गडी बाद झाल्याने इंग्लिश संघाला सावरता आले नाही.

आकाशने पुन्हा क्रॉलीचा क्लीन बोल्ड केले. क्रॉलीला 42 धावा करता आल्या. त्यांनतर अश्विनने जॉनी बेअरस्टोला तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला आऊट केले. आता इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत गेला आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या दोन तासातच अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. बेअरस्टो 38 तर स्टोक्सला तीन धावा करता आल्या. स्टोक्स बाद होताच लंचची घोषणा करण्यात आली.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : इंग्लंडला 109 धावांवर चौथा धक्का

इंग्लंडला 109 धावांवर चौथा धक्का बसला. अश्विनने सामन्यातील पहिली विकेट घेत जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 35 चेंडूत 38 धावा करून तो बाद झाला. बेअरस्टोने जो रूटसोबत चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. यापूर्वी आकाश दीपने कहर पाहिला मिळाला. त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरच त्याने जॅक क्रोली, बेन डकेट आणि ऑली पोप यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : पदार्पण सामन्यात आकाश दीपच्या कामगिरीने उडाली खळबळ! इंग्लंडला दिले तीन मोठे धक्के

रांचीमध्ये आकाश दीपचा कहर पाहायला मिळत आहे. त्याने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

आकाशने इंग्लिश डावातील दहाव्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला आऊट केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला ओली पोपला षटकाच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केले. पोप यांना खातेही उघडता आले नाही.

त्यानंतर त्याने क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. त्याने शानदार शैलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तीन गडी गमावून इंग्लंडची धावसंख्या सध्या 57 धावा आहे. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहेत. इंग्लंडने पहिल्या तासातच तीन विकेट गमावल्या आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : रांचीत आकाशचा राडा! पदार्पण सामन्यात एका षटकात इंग्लंडला दोन धक्के

क्रॉलीची विकेट हुकल्यानंतर आकाश दीपने इंग्लिश डावातील दहाव्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला आऊट केले. त्याला 11 धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला ओली पोप षटकाच्या चौथ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.

आकाशने जबरदस्त स्टाइलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पोप यांना खातेही उघडता आले नाही.

इंग्लंडची धावसंख्या सध्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा आहे. क्राऊली आणि रूट क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : रांचीत इंग्लंडचा तांडव! 4,4,4,6... सिराजला एका षटकात जॅक क्रॉलीने ठोकल्या 19 धावा

डावाच्या सातव्या षटकात जॅक क्रॉलीने मोहम्मद सिराजच्या शेवटच्या चार चेंडूंवर तीन चौकार मारले. चौकारांची हॅट्ट्रिक करण्यासोबतच त्याने शेवटच्या चेंडूवर षटकारही ठोकला. यासह क्रॉलीने वैयक्तिक धावसंख्या 32 पर्यंत पोहोचवली आहे.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या भारताची प्लेइंग-11

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एकच बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीप आला आहे.

Ind vs Eng 4th Test Day 1 Live : 3 की 4... किती फिरकी गोलंदाजांसह रोहित उतरणार मैदानात? थोड्याच वेळात नाणेफेक

पहिल्या तीन सामन्यांच्या तुलनेत रांचीतील खेळपट्टी फिरकीस अधिक प्रमाणात साथ देणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याचीही उत्सुकता वाढली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ind vs Eng Test Cricket : मालिका विजयाचे ध्येय ; भारतीय संघाने कंबर कसली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.