Ind vs Eng 4th Test Day 3 : भारताची दुसऱ्या डावात दमदार सुरूवात; दिवस अखेर केल्या 40 धावा, विजयापासून 'इतक्या' धावा दूर

India vs England 4th Test Day 3 Live Scorecard Updates : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे.
India vs England 4th Test Day 3 Live Scorecard Updates News Marathi
India vs England 4th Test Day 3 Live Scorecard Updates News Marathiesakal
Updated on

India vs England 4th Test Day 3 Live Score :

भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावात संपुष्टात आणला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने 5 तर कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर बेअरस्टोनने 30 धावा केल्या.

भारताला विजयासाठी 192 धावांची गरज असताना तिसऱ्या दिवस अखेर भारताने नाबाद 40 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने 16 तर रोहित शर्माने 24 धावा केल्या आहेत. भारत विजयापासून अजून 152 धावा दूर आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लिश संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला.

Ind vs Eng 4th Test Day 3 : भारताची दुसऱ्या डावात दमदार सुरूवात; दिवस अखेर केल्या 40 धावा, विजयापासून 'इतक्या' धावा दूर

इंग्लंडचे 192 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने आपल्या दुसऱ्या डावात दमदार सुरूवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने नाबाद 40 धावा केल्या असून भारताला आता चौथ्या दिवशी विजयासाठी 152 धावांची गरज आहे.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावात गारद, भारताला विजयासाठी 192 धावांची गरज

रविचंद्रन अश्विनने बेन फोक्सला 17 तर जेम्स अँडरसनला शुन्यावर बाद करत भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर संपवला. इंग्लंडकडे दुसऱ्या डावात 191 धावांची आघाडी असून भारताला सामना जिंकण्यासाठी 192 धावांची गरज आहे.

षटकात इंग्लंडच्या केल्या दोन शिकार

कुलदीप यादवच्या फिरकीची जादू चाली आहे. त्याने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन शिकार केल्या. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने टॉम हार्टलीला तर शेवचच्या चेंडूवर ओली रॉबिन्सन एलबीडब्ल्यू आऊट झाला. हार्टलीला सात धावा करता आल्या. त्याचवेळी रॉबिन्सनला खातेही उघडता आले नाही. कुलदीपने आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची आघाडी 179 धावांची आहे.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : टी-ब्रेकनंतर पहिल्याच चेंडूवर जडेजाने इंग्रजांना दिला मोठा धक्का

टी-ब्रेकनंतर लगेचच इंग्लंडला सहावा धक्का बसला. जडेजाने जॉनी बेअरस्टोला आऊट केले. त्याला 30 धावा करता आल्या. सध्या बेन फॉक्स आणि टॉम हार्टले क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : दुसरा सत्रात मोठी उलथापालथ! अश्विन-कुलदीपने इंग्लंडला दिले पाच धक्के, 166 धावांच्या आघाडी

चहापानापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात पाच गडी गमावून 120 धावा केल्या होत्या. जॉनी बेअरस्टो 30 आणि बेन फॉक्स 4 धावांवर फलंदाजी करत आहे. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी होती. या आधारावर इंग्लंडची आतापर्यंतची आघाडी 166 धावांची आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या तर भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : घातक कुलदीप...! जॅक क्रॉलीला केलं क्लीन बोल्ड; इंग्लंडची आघाडी 150 धावांच्या पार

इंग्लंडला 120 धावांवर पाचवा धक्का बसला. जॅक क्रोलीनंतर कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : अश्विनची कमाल... जो रुट तंबूत; इंग्लंडला बसला तिसरा धक्का

इंग्लंडला 65 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. अश्विनने जो रूटला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 11 धावा करून बाद झाला. अश्विनचे ​​हे तिसरे यश आहे. याआधी त्याने सलग दोन चेंडूंवर बेन डकेट आणि ऑली पोप यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. सध्या जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : अश्विनची कमाल...! इंग्लंडला 19 वर दोन चेंडूत दोन धक्के

19 धावांवर इंग्लंडला दोन धक्के बसले आहे. अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. तो हॅट्ट्रिकवर आहे. मात्र, हॅटट्रिकचा खुलासा पुढील षटकात होईल. षटकाच्या पाचव्या चेंडूवर अश्विनने बेन डकेटला आऊट केले. त्याचवेळी पुढच्याच चेंडूवर ओली पोप एलबीडब्ल्यू आऊट झाला.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : ध्रुव जुरेलचे शतक हुकले...! भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपला, बशीरचा विकेटचा पंजा

भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंड दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडी आहे.

भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 90 धावा केल्या. त्याचे शतक हुकले आणि 10वी विकेट म्हणून तो आऊट झाला. त्याला टॉम हार्टलेने क्लीन बोल्ड केले. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी आणि ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित भारतीय खेळाडूंनी ज्युरेलला स्टँडिंग ओव्हेशन दिले.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : बशीरचा विकेटचा पंजा! भारताला 293 धावांवर नववा धक्का, ज्युरेल शतकाच्या जवळ

293 धावांवर भारताला नववा धक्का बसला. शोएब बशीरने आकाश दीपला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला नऊ धावा करता आल्या. आकाशने ध्रुव जुरेलसोबत नवव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : ध्रुव जुरेलने ठोकले कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक

कठीण काळात आलेल्या ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 96 चेंडूत झळकावले. भारताच्या आशा आता त्याच्यावरच आहेत. जुरेलने या डावात आतापर्यंत तीन चौकार आणि एक गगनचुंबी षटकार मारला आहे.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : टेन्शनमध्ये टीम इंडिया! 253 धावांवर बसला आठवा धक्का

253 धावांवर कुलदीप यादवच्या रूपाने भारताला आठवा धक्का बसला. जेम्स अँडरसनने त्याची शिकार केली. तो वैयक्तिक 28 धावांवर बाद झाला. यासह त्याची जुरेलसोबतची 76 धावांची भागीदारीही संपुष्टात आली.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : ध्रुव जुरेल अन् कुलदीप यादव यांच्यात अर्धशतकी भागीदारी!

भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 250 धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल 46 धावा करून आणि कुलदीप यादव 28 धावा करून खेळत आहेत. दोघांमध्ये 60+ धावांची भागीदारी झाली आहे.

Ind vs Eng 4th Test Day 3 Live : पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ होणार का खराब? मोठी अपडेट आली समोर

रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवसापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. Accuweather नुसार, रांचीमध्ये कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाची जवळपास 59 टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत पावसामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ खराब होऊ शकतो. त्याच वेळी, रांचीमध्ये आज तापमान 12 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.