India vs England 4th Test Playing 11 : इंग्लंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. तेव्हा सर्वांना वाटले की बॅझबॉल भारतातही प्रभावी ठरेल. पण पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडची प्रत्येक चाल उलटली आहे.
इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी तर तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पण या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.
या मालिकेत इंग्लंडचा संघ पिछाडीवर आहे. त्यामुळे बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला चौथा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन चौथ्या कसोटी सामन्यासाठी चालू मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एकच वेगवान गोलंदाज खेळला होता. पण यानंतर वुड दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आणि जेम्स अँडरसनला संधी मिळाली. तिसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसन आणि वुड या दोघांना संधी मिळाली. मात्र दोन्ही खेळाडूंना छाप पाडण्यात यश आले नाही. या दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या सामन्यात एकूण 5 बळी घेतले.
या कारणामुळे मार्क वुडला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. आणि ऑली रॉबिन्सनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, इंग्लंड संघाला हे देखील ठरवावे लागेल की त्यांना जेम्स अँडरसनसोबत पुढे जायचे आहे की शोएब बसीरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची आहे. अँडरसनने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंतच्या दोन सामन्यांत ३५.८३च्या सरासरीने सहा विकेट्स घेतल्या आहेत.
ऑली रॉबिन्सनने जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. पण त्याने पाकिस्तान दौऱ्यावर चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर 21.22 च्या सरासरीने नऊ जणांना बाद केले. तर पाकिस्तानात त्यावेळच्या वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळाली नाही. आतापर्यंत त्याने इंग्लंडकडून 19 सामन्यांत 22.21 च्या सरासरीने 76 बळी घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.