भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर 1 बाद 135 धावा केल्या. पहिल्या डावात भारत अजूनही 83 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडून दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केली. जैस्वालने 57 तर रोहित शर्माने नाबाद 52 धावा केल्या.
तत्पूर्वी, कुलदीप यादवने 5 आणि आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव दोन सत्रातच 218 धावांवर संपला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्राऊलने सर्वाधिक 79 धावा केल्या.
यशस्वी जैस्वालने अर्धशतकाजवळ पोहचताच आक्रमक फलंदाजी केली. मात्र 58 चेंडूत 57 धावा झाल्यानंतर तो बाद झाला.
भारताने आपल्या पहिल्या डावाची सुरूवात आक्रमक केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी नाबाद 75 धावांची भागीदारी रचली असून रोहित 40 धावांवर तर यशस्वी जैस्वाल नाबाद 36 धावा करून खेळत आहे.
चहापानानंतर उरलेल्या इंग्लंडच्या संघाला फारशी वळवळ न करू देता आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने फोक्सला 24 तर जेम्स अँडरसनला शुन्यावर बाद करत इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपवला.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजींना दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची चहापानापर्यंत अवस्था 8 बाद 194 धावा अशी केली. खेळ थांबला त्यावेळी बेन फोक्स 8 तर शोएब बशीर 5 धावा करून नाबाद होते.
रविचंद्रन अश्विनने आपल्या 100व्या कसोटीत एकाच षटकात दोन विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या डावाच्या 50 व्या षटकात टॉम हार्टले आणि मार्क वुडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्टलीला सहा धावा करता आल्या, तर वुडला खातेही उघडता आले नाही.
लंचपर्यंत इंग्लंड संघाने 100 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. पण लंचनंतर एका तासात त्याचा निम्मा संघ तंबूत गेला आहे. कुलदीप यादवने धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने बेन स्टोक्सच्या रूपाने पाचवी विकेट घेतली. त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. कसोटीत चौथ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडला 175 धावांवर पाचवा धक्का बसला. इंग्लंडने 136 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर इंग्लिश संघाने 39 धावा करताना आणखी तीन विकेट गमावल्या आहेत. पाचवी विकेट म्हणून जडेजाने जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला 26 धावा करता आल्या. सध्या कर्णधार बेन स्टोक्स आणि बेन फॉक्स क्रीजवर आहेत. याआधी कुलदीपने चार विकेट घेतल्या आहेत. त्याने जॅक क्रॉली (79), बेन डकेट (27), ऑली पोप (11) आणि जॉनी बेअरस्टो (29) यांना बाद केले.
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 175 धावांवर चौथा धक्का बसला. कुलदीपने जॉनी बेअरस्टोला आऊट करत विकेटचा चौकार मारला. यासह कुलदीपच्या कसोटीतील 50 विकेट्सही पूर्ण झाल्या आहेत.
बेअरस्टो आपल्या 100व्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात अपयशी ठरला. त्याला 18 चेंडूत 29 धावा करता आल्या. सध्या कर्णधार बेन स्टोक्स आणि जो रूट क्रीजवर आहेत.
इंग्लंडला 137 धावांवर तिसरा धक्का बसला. कुलदीप यादवने जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. त्याला 79 धावा करता आल्या. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. सध्या 100 वी कसोटी खेळणारे जॉनी बेअरस्टो आणि जो रूट क्रीझवर आहेत.
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहेत. क्राउली 61 धावांवर फलंदाजी करत असून रुटने एक धाव घेतली आहे. इंग्लंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 101 धावा आहे. कुलदीप यादवने दोन बळी घेतले. त्याने बेन डकेट आणि ऑली पोपला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
इंग्लंडला 100 धावांवर दुसरा धक्का बसला आणि या विकेटसह अंपायरने लंच घेण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या सत्रात 25.3 षटके टाकण्यात आली आणि इंग्लंडने सुमारे चारच्या धावगतीने धावा केल्या. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी तोडली. त्याने डकेट झेलबाद केले. डकेट 27 धावा करू शकला.
यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले.
लंचपूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप 11 धावा करू शकला. सध्या क्राऊली 61 धावांवर नाबाद आहे.
इंग्लंडला पहिला धक्का 64 धावांवर बसला आहे. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डकेट झेलबाद झाला. शुभमन गिलने मागे धावताना डकेटचा अप्रतिम झेल घेतला. सध्या ओली पोप मैदानात आले आहेत. जॅक क्रॉली 37 धावा करून क्रीजवर आहे.
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची इंग्लंडची फलंदाजी सुरू झाली आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट क्रीजवर आहेत. जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकले.
पहिल्या अर्ध्या तासात सात षटकाचा सामना खेळल्या गेला आहे. ज्यामध्ये इंग्लंडची धावसंख्या एकही विकेट न पडता 20 धावा आहे.
अश्विन आपली 100वी कसोटी खेळत आहे. राहुल द्रविडने त्याची पत्नी प्रीती आणि दोन्ही मुलींच्या उपस्थितीत त्याला त्याची 100 वी कसोटी कॅप दिली. त्याचवेळी बेअरस्टोला त्याची आई, त्याची बहीण, पत्नी आणि मुलाच्या उपस्थितीत विशेष कसोटी कॅप देण्यात आली.
इंग्लंड : जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast Day 1 : 9 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि इंग्लंडचे संघ पुन्हा मैदानात उतरणार आहेत. उभय संघांमधील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवार 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरू होत आहे. पण......
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.