भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा दुसरा दिवशी भारतीय फलंदाजांनी गाजवला. भारताने पहिल्या दिवशाच्या 1 बाद 135 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली अन् दिवस अखेर 8 बाद 473 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे दिवसअखेर 255 धावांची आघाडी आहे.
भारताकूडन आज दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकण्यात आली. कर्णधार रोहित शर्माने 103 तर शुभमन गिलने 110 धावांची खेळी केली. त्यानंतर सर्फराज खानने देखील 56 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला देवदत्त पडिक्कलने 103 चेंडूत 65 धावा करत चांगली साथ दिली.
इंग्लंडकडून फिरकीपटू शोएब बशीरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर टॉम हार्टलीने 2 आणि अँडरसन, स्टोक्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताच्या 1 धावात तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आलेल्या बुमराह आणि कुलदीपने नवव्या विकेटसाठी नाबाद 45 धावांची भागीदारी रचत संघाला 473 धावांपर्यंत पोहचवले. भारताकडे दिवसअखेर 255 धावांची आघाडी आहे.
भारताने जवळपास 200 धावांची आघाडी घेतली आहे. मात्र तिसऱ्या सत्रात भारताला अजून दोन धक्के बसले. ध्रुव जुरेल 15 धावा करून शोएब बशीरची शिकार झाला. तर टॉम हार्टलीने 15 धावांवरच रविंद्र जडेजाला देखील बाद केलं. त्यानंतर आलेला अश्विन देखील शुन्यावर परतला.
भारताने आपल्या पहिल्या डावात 4 बाद 400 धावा करत इंग्लंडवर मोठी आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खान यांनी अर्धशतक ठोकले आहे. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळी करत भारताला भक्कम स्थितीत पोहचवले आहे. भारताच्या 4 बाद 390 धावा झाल्या असून भारताकडे 176 धावांची आघाडी आहे.
सत्राच्या सुरूवातीला भारताला धक्का बसणे सुरूच राहिले. चहापानानंतर शोएब बशीरने सर्फराज खानला 56 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. त्याने पडिक्कल आणि खानची 97 धावांची भागीदारी तोडली.
सर्फराज खानने आपले तिसरे कसोटी अर्धशतक ठोकले असून पदार्पण करणारा देवदत्त पडिक्कल देखील आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे. भारताने 158 धावाची लीड घेतली असून सर्फराज आणि पडिक्कल यांची भागीदारी शतकाच्या जवळ पोहचली आहे. भारताच्या 3 बाद 376 धावा झाल्या आहेत.
रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि सर्फराज खानने डाव सावरत भारताला 72 षटकात 315 धावांपर्यंत पोहचवले. भारताकडे आता 97 धावांची भक्कम आघाडी आहे.
लंचनंतर शतकी खेळी करणारे रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे पाठोपाठ बाद झाले. स्टोक्स आणि जेम्स अँडरसन यांनी या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे भारताची अवस्था 1 बाद 275 धावांवरून 3 बाद 279 धावा अशी झाली
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर आपले निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताने या सत्रात 135 धावा करत एकही विकेट गमावली नाही. भारताकडे आता 46 धावांची भागीदारी असून रोहित शर्मा 102 तर शुभमन गिल 101 धावांवर खेळत आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दोघांनीही शतकी खेळी करत दुसऱ्या डावात नाबाद 150 धावांची आघाडी घेतली. भारताने 60 षटकात 1 बाद 263 धावा केल्या आहेत. रोहितचे हे 12 वे कसोटी शतक आहे तर गिलचे चौथे कसोटी शतक आहे.
भारताने इंग्लंडच्या 218 धावांचा टप्पा पार केला असून पहिल्या डावात आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, रोहित शर्मा आणि
शुभमन गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारतीय संघ देखील 200 धावांच्या जवळ पोहचला आहे.
भारताने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक सुरूवात करत इंग्लंडची आघाडी झपाट्याने कमी केली. भारताच्या 38 षटकात 1 बाद 180 धावा झाल्या असून रोहित शर्मा 72 तर शुभमन गिल हा 47 धावांपर्यंत पोहचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.