India vs England 5th Test Day 3 Score : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला आहे. धरमशाला येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला.
इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला. अशा प्रकारे टीम इंडियाला 259 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला आणि भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता, पण त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामने जिंकले.
इंग्लंडला 189 धावांवर नववा धक्का बसला. रवींद्र जडेजाने शोएब बशीरला क्लीन बोल्ड केले. त्याला 13 धावा करता आल्या. सध्या जो रूट आणि जेम्स अँडरसन क्रीजवर आहेत. रूटने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 61 वे अर्धशतक झळकावले.
141 धावांवर इंग्लंडला दोन धक्के बसले आहे. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 35 व्या षटकात टॉम हार्टली (20) आणि त्यानंतर मार्क वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सध्या जो रूट आणि शोएब बशीर क्रीजवर आहेत. टीम इंडिया डावाने विजयाकडे वाटचाल करत आहे. त्याला फक्त दोन विकेट्सची गरज आहे.
इंग्लंडला 113 धावांवर सहावा धक्का बसला आहे. अश्विनने बेन फॉक्सला क्लीन बोल्ड केले. त्याला आठ धावा करता आल्या. या विकेटसह अश्विनने आपली शंभरवी कसोटी खेळत डावात पाच बळीही पूर्ण केले. कसोटीत पाच बळी घेणारा हा त्याचा 36वा सामना आहे.
तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 103 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही 156 धावांनी मागे आहे. इंग्लिश संघाला डावाने पराभवाचा धोका आहे. लंचच्या आधीच्या चेंडूवर अश्विनने बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले. या विकेटसह अंपायरने लंच घोषित केले. स्टोक्सला दोन धावा करता आल्या. या संपूर्ण मालिकेत स्टोक्स बॅटने फ्लॉप ठरला आहे.
अश्विनची या डावातील चौथी विकेट आहे. यापूर्वी जॅक क्रोली (0), बेन डकेट (2) आणि ऑली पोप (19) बाद झाले आहेत. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला (39) कुलदीप यादवने पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्याने रूटसोबत 56 धावांची भागीदारी केली. सध्या जो रूट 34 धावांवर नाबाद आहे.
इंग्लंडला चौथा धक्का 92 धावांवर बसला आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आपल्या पहिल्याच षटकात कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो LBW आऊट झाला. बाद होण्यापूर्वी त्याने वेगवान खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा 100 वा कसोटी सामना होता. त्याने 31 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. त्याने रूटसोबत 56 धावांची भागीदारी केली.
अश्विनने दुसऱ्या षटकात बेन डकेट आणि सहाव्या षटकात जॅक क्रॉलीला बाद करून भारताला दोन यश मिळवून दिले.
इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. पहिले षटक टाकणाऱ्या रविचंद्रन अश्विनने बेन डकेटला बाद केले.
भारताचा पहिला डाव 477 धावांवर संपला आहे. आज भारताने आठ विकेट्सवर 473 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. पण उर्वरित दोन विकेट तिसऱ्या दिवशी पहिल्या 15 मिनटात पडल्या.
आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या (30) रूपाने बसला. जेम्स अँडरसनने त्याला आऊट केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही 700 वी विकेट होती.
त्याचवेळी शोएब बशीरने बुमराहला (20) यष्टीचीत करून भारताचा डाव 477 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 259 धावांची आघाडी मिळाली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. टीम इंडियाकडे 255 धावांची आघाडी आहे, त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ कोणत्या प्लॅनने मैदानात उतरला आहे, हे पाहण्यासाठी सगळे जण उत्सुक असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.