Ind Vs Eng 5th Test Weather Forecast : बर्फवृष्टी अन् पावसामुळे शेवटचा कसोटी सामना होणार रद्द? कसे आहे धरमशालातील हवामान

India vs England 5th Test Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान धरमशाला हिमाचल प्रदेश येथे खेळला जाणार आहे.
Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast news in marathi
Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast news in marathi
Updated on

Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान धरमशाला हिमाचल प्रदेश येथे खेळला जाणार आहे. भारताने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला होता आणि त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित तीन सामने जिंकले.

Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast news in marathi
T20 World Cup : तिकिटांच्या किमती भिडल्या गगनाला! Ind vs Pak वर्ल्डकप सामना पाहायचाय... मोजा इतके कोटी

पण, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. पण या सामन्यापूर्वी धरमशालाच्या हवामानाबाबत एक मोठा अपडेट समोर येत आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे शेवटचा कसोटी सामना रद्द होऊ शकतो.

Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast news in marathi
कसोटी सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर, बदलीची घोषणा! 'या' स्टारला मिळाली संधी

सात मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारत आणि इंग्लंडचे दोन्ही संघ धरमशाला येथे पोहोचले आहेत. 4 मार्चपासून दोन्ही संघ सरावासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र, हवामानामुळे भारत आणि इंग्लंडच्या सराव सत्रात अडथळा येऊ शकतो.

Accuweather नुसार, धरमशालामध्ये 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान मुसळधार पावसासह बर्फवृष्टीचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना फक्त इनडोअर सराव करावा लागेल.

Ind vs Eng 5th Test Dharamsala Weather Forecast news in marathi
IPL 2024 : एका खेळाडूमुळे चेन्नईला बदलावा लागला प्लॅन! ऋतुराजला मिळणार नवा जोडीदार

7 ते 11 मार्च पर्यंत कसे असेल धरमशालातील हवामान?

  • Accuweather नुसार, सामन्याच्या पहिल्या दिवस - 7 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत धरमशालामध्ये जोरदार बर्फवृष्टी होईल. यानंतर सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 98 टक्के पावसाची शक्यता आहे.

  • सामन्याचा दुसरा दिवस- 8 मार्च रोजी ढगांची चलबिचल दिसेल. मात्र हवामान स्वच्छ राहील.

  • दिवस तिसरा - 9 मार्च रोजी पण धरमशालामध्ये हवामान स्वच्छ राहील.

  • चौथा दिवस- 10 मार्च रोजी आकाशात ढगांची चलबिचल दिसेल. पण हवामान स्वच्छ राहील.

  • पाचवा दिवस - 11 मार्च रोजी कसोटीच्या शेवटच्या दिवशी आकाश ढगाळ असेल आणि पावसाची 26 टक्के शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.