Ind vs Eng R Ashwin : 'त्या मालिकेने सर्व काही बदलले...', पाचव्या कसोटीपूर्वी अश्विनचा मोठा खुलासा

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
ind vs eng 5th test r ashwin News Marathi
ind vs eng 5th test r ashwin News Marathi
Updated on

R Ashwin India vs England 5th Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात भारताने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाचा पाच गडी राखून पराभव केला. आता संघाची नजर पाचव्या कसोटीवर आहे. धरमशाला येथे होणारा हा सामना भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी खास असणार आहे.

ind vs eng 5th test r ashwin News Marathi
Shahbaz Nadeem News : शेवटच्या कसोटीआधी 500 विकेट घेणाऱ्या टीम इंडियाच्या स्पिनरने अचानक घेतली निवृत्ती!

या सामन्यापूर्वी अनुभवी गोलंदाज म्हणाला की, 2012 ची इंग्लंडविरुद्धची मालिका त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होती. त्या मालिकेमुळे त्याला त्याच्या चुका ओळखण्यात आणि सुधारण्यात मदत झाली. अश्विन आता 7 मार्चला कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार आहे.

भारतासाठी 99 कसोटी सामने खेळलेल्या या स्टार गोलंदाजाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "इंग्लंडविरुद्धची 2012 ची मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होती. मला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे मला सांगण्यात आले.

ind vs eng 5th test r ashwin News Marathi
Colin Munro Viral Video : क्रिकेटपटूचं ट्रेनिंग अन् बॉल बॉयने पकडला अप्रतिम कॅच; न्यूझीलंड मुनरोचा व्हिडीओ एकदा पाहाच

याशिवाय, त्याने सांगितले की, त्याच्या कारकिर्दीतील 100 वी कसोटी त्याच्यासाठी खास आहे. ही एक मोठी संधी आहे. हा प्रवास खुप खास होता. यामुळे माझ्या तयारीत कोणताही बदल झालेला नाही. आम्हाला कसोटी सामना जिंकायचा आहे.

2011 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने राजकोट कसोटीदरम्यान 500 कसोटी बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी माजी कर्णधार अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती. त्याच्या नावावर 132 कसोटीत 619 विकेट आहेत.

ind vs eng 5th test r ashwin News Marathi
Tushar Arothe News : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरी पोलिसांचा छापा; 1.1 कोटी रूपये जप्त

भारतीय संघ पाचव्या कसोटीसाठी : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.