Shubman Gill Takes Ben Duckett Catch : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी भारतीय ऑफस्पिनर आर अश्विन आपली 100वी कसोटी खेळत आहे आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो देखील आपली 100वी कसोटी खेळत आहे.
सामन्याचा पहिल्या एक दीड तास इंग्लंडचे दोन्ही सलामीचे फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. टीम इंडिया पहिली विकेट मिळत नव्हती. पण त्यावेळी टीम इंडियासाठी कुलदीप यादव धावून आला. त्याने बेन डकेटला 27 धावांवर बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपच्या चेंडूवर डकेटने हवेत शॉट खेळला होता. आणि चेंडू हवेत उंच गेला पण शुभमन गिलने शानदार सुपरमॅन शैलीत झेल घेतला.
इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 18 व्या षटकात असे घडले की कुलदीप यादवचा एक चेंडू बेन डकेटच्या बॅटची कड घेऊन थेट हवेत गेला. मात्र, चेंडू क्षेत्ररक्षकापासून लांब पडत असल्याचे दिसत होते. पण शुबमन गिलने तिथे चपळाई दाखवली आणि तो चेंडूवर नजर ठेवून पकडण्यासाठी मागे धावला. मग शेवटी उडी मारत त्याने तो झेल पकडला.
गिलचा हा झेल टीम इंडियाला किती दिलासा देणारा होता, हे कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत सेलिब्रेशन करणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवरून स्पष्टपणे दिसून येते. धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडने 2 गडी गमावून 100 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.