Ing vs Eng : कर्णधाराच्या भरवशावर रजत पाटीदारने फिरलं पाणी, चौथ्या कसोटीत प्लेइंग-11 मधून होणार बाहेर?

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रजत पाटीदार काही विशेष कामगिरी करू शकला नाही...
Ind Vs Eng Rajat Patidar Marathi News
Ind Vs Eng Rajat Patidar Marathi Newssakal
Updated on

Ind Vs Eng Rajat Patidar : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रजत पाटीदार काही विशेष कामगिरी करू शकला नाही. तिसऱ्या दिवशी तो शून्यावर बाद झाला. टॉम हार्टलीने त्याला आपला शिकार बनवले. यापूर्वी भारताच्या पहिल्या डावातही तो केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत तो चौथ्या कसोटीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे.

Ind Vs Eng Rajat Patidar Marathi News
Mike Procter Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पाटीदारला या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. यादरम्यान तो पहिल्या डावात 32 आणि दुसऱ्या डावात 9 धावा करून बाद झाला. 30 वर्षीय फलंदाज काही विशेष दाखवू शकला नाही. त्याने कर्णधाराच्या भरवशावर पाणी फिरलं आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल चौथ्या कसोटीत परतला तर रजतला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

Ind Vs Eng Rajat Patidar Marathi News
Ind vs Eng : रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट, राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वाल पुन्हा करणार फलंदाजी? जाणून घ्या ICC चा नियम

टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे विशाखापट्टणम कसोटीत सहभागी होऊ शकला नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला प्लेइंग 11 चा भाग बनवण्यात आले नाही. सध्या राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) आहे. चौथ्या कसोटीत स्टार क्रिकेटरचे पुनरागमन शक्य आहे. राहुलने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 86 तर दुसऱ्या डावात 22 धावा केल्या.

Ind Vs Eng Rajat Patidar Marathi News
Ind vs Eng Test : भारतीयांचा इंग्लंडवर उलटवार ; सिराजच्या चार विकेट, तर यशस्वीचा शतकी हल्लाबोल

रजत पाटीदार यांची देशांतर्गत कारकीर्द चांगली आहे. त्याने 56 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4041 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 12 शतके आणि 22 अर्धशतके आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 आहे.

त्याने 58 लिस्ट ए सामन्यांमध्ये तीन शतके आणि 12 अर्धशतकांच्या मदतीने 1985 धावा केल्या. पाटीदार आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसत आहे. गेल्या वर्षी त्याने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रजतने आतापर्यंत खेळलेल्या एका सामन्यात 22 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.