ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची उडवली खिल्ली; त्यांनी पोस्ट केलेला Video पाहून चाहते खवळले

IND vs NZ: आजपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यातील भारताचा डाव न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४६ धावांवर गुंडाळला.
IND vs AUS
IND vs AUSesakal
Updated on

IND vs AUS Cricket Update: आज न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव न्युझीलंडने ४६ धावांवर गुंडाळला. न्युझीलंडविरूद्धच्या या डावावरून ऑस्ट्रेलियाने भारताला २०२० मधील ऍडलेड वरील खेळीची आठवण करून देत डिवचले आहे. भारताने २०२० मधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामन्यातील डावात केवळ ३६ धावा केल्या होत्या. नोव्हेंबर मध्ये सुरू होणाऱ्या आगामी बॉर्डर गावस्कर मालिकेच्या अनुशंगाने ऑस्ट्रेलियाने या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियीवर पोस्ट करत भारताला चिडवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताने आज घरच्या मैदानावर कसोटी मधील सर्वात कमी धावसंख्या केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये केवळ ३६ धावांवर गुंडाळले होते. या डावात भारताच्या एकाही फलंदाजाने दोन आकडी धावसंख्या केली नव्हती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेतील पहिलाच सामना ८ विकेट्सने गमवला. पुढे विराट कोहली वैयक्तिक कामासाठी मायदेशी परतला आणि अजिंक्य रहाणेने संघाची सुत्रे हातामध्ये घेतली. रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत पुनरागम केले आणि २-१ ने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे केली.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने एकहाती विजय मिळवला. कालपासून न्युझीलंडविरूद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार होती परंतु पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्याला आजपासून सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, मागच्या दहा वर्षांपासून घरच्या मैदानावर वर्चस्व कायम ठेवलेल्या भारताचा पहिला डाव न्युझीलंडने केवळ ४६ धावांवर गुंडाळला. महत्वाचे म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १८८८ नंतर प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये आघाडीच्या ८ फलंदाजांपैकी ५ जणं शून्यावर बाद झाले.

या सामन्यात न्युझीलंडच्या मॅट हेन्रीने भारताच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले. विलियम ओ'रौर्कने ४ विकेट्स घेतले तर टीम साऊदीला १ विकेट घेण्यात यश आले. न्युझीलंडच्या डावाला सुरुवात झाली असून न्युझीलंडने १ बाद ८२ धावा करत सामन्यात ३६ धावांनी आघाडी घेतली आहे. तर,डेव्हॉन कॉनवेने ६४ चेंडूत ६१ धावांवर अर्धशतक झळकावत नाबाद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.