IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

New Zealand Lead by 356 runs against India in 1st test: भारताविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्या डावात तब्बल ३५६ धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने शतक केले, तर टीम साऊदीनेही अर्धशतकी खेळी केली.
India vs New Zealand 1st test
India vs New Zealand 1st testSakal
Updated on

India vs New Zealand 1st Test: बंगळुरुमध्ये होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या खराब खेळानंतर तिसऱ्या दिवशी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताचे हे प्रयत्न रचिन रविंद्र आणि टीम साऊदी यांनी अपयशी ठरवले.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पहिल्या डावात ९१.३ षटकात ४०२ धावांवर सर्वबाद केले आहे. त्यामुळे न्यूझीलंड ३५६ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी ठरले आहेत. ही न्यूझीलंडने परदेशात घेतलेली पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च आघाडी ठरली आहे.

परदेशात कसोटीमध्ये पहिल्या डावात न्यूझीलंडने घेतलेली सर्वोच्च आघाडी

  • ४१२ धावा - विरुद्ध झिम्बाब्वे, बुलवायो, २०१६

  • ३९३ धावा - विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, २००५

  • ३७४ धावा - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, १९८५

  • ३६३ धावा - विरुद्ध बांगलादेश, चितगाव, २००४

  • ३५६ धावा - विरुद्ध भारत, बंगळुरू, २०२४

या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी भारताचा संघ ४६ धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने शानदार फलंदाजी करताना दुसऱ्या दिवस अखेर ५० षटकात ३ बाद १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुढे न्यूझीलंडने खेळायला सुरुवात केली.

India vs New Zealand 1st test
IND vs NZ: रचिन रविंद्र भारताला नडला! आपल्याच मुळगावी कुटुंबासमोर ठोकली दुसरी 'सेंच्युरी'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.