IND vs NZ 1st Test : सर्जरी झाली, त्याच गुडघ्यावर चेंडू आदळलाय...! ऋषभ पंतच्या दुखापतीवर Rohit Sharma चे मोठे अपडेट्स

India vs New Zealand 1st Test day 2 : भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाखेर ३ बाद १८० धावा केल्या आहेत. कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता.
IND vs NZ 1st Test (
IND vs NZ 1st Test (esakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघाने बंगळुरू कसोटीत चाहत्यांना निराश केले. भारताचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही आणि त्यामुळे संपूर्ण संघ ४६ धावांवर तंबूत परतला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री ( ५-१५) व विलियम रोकू ( ४-२२) यांनी ९ विकेट्स घेतल्या. डेव्हॉन कॉनवेच्या ९१ धावांच्या खेळीने न्यूझीलंडला मजबूत आघाडी मिळवून दिली. भारतासाठी रवींद्र जडेजा, कुलदीप यादव व आर अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळवली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ३ बाद १८० धावा करताना १३४ धावांची आघाडी घेतली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.