IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेले आहेत. ४६ धावांवर पहिला डाव गुंडाळला गेल्यानंतर भारतीय गोलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगला चोप दिला. त्यात यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत ( Rishabh Pant Injured) दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला.