IND vs NZ 1st Test : Rohit Sharma बोल्ड झाला, विराट कोहलीच्या विकेटवरून वाद रंगला; Sarfaraz Khan ही भोपळ्यावर परतला

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघाची दुसऱ्या दिवशी सुरुवात काही खास झाली नाही. रोहित शर्मा, विराट कोहली व सर्फराज खान हे आघाडीचे तिन्ही फलंदाज अवघ्या १० धावांवर तंबूत परतले आहेत.
IND vs NZ 1st Test day 2
IND vs NZ 1st Test day 2esakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. पण, दुसऱ्या दिवशी वरूण राजाने कृपा दाखवल्याने दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय न्यूझीलंडच्या पथ्यावर पडला आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम साऊदीच्या गोलंदाजीवर फसला. विराट कोहली व सर्फराज खान हे दोघंही भोपळ्यावर माघारी परतल्याने टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.